नगरपरिषदेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवरून गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांत रोष असतानाही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आज, सोमवारी सकाळच्या सुमारास सिव्हिल लाईन, मामा चौक परिसरात भूमिगत गटार योजनेच्या १२ फूट खड्ड्यातील नालीमध्ये एक मजूर अडकला. यात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

सुरेश जगन नेवारे असे मृत कामगाराचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते इरफान सिध्दीकीसह गोंदियातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच येथील बांधकामाची तक्रार केली होती. मात्र नगरपरिषदेचे प्रशासक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी या तक्रारींकडे कानाडोळा करीत कंत्राटदाराचा बचाव करण्याची भूमिका घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. १२ फूट खोल खड्ड्यात काम करायचे असतानाही मजुराला सुरक्षेची कोणतीही साधने पुरविली नव्हती, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी येथे येऊन जोपर्यंत २५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करीत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.