शहरात जागतिक दर्जाचे एक मोठे उद्यान साकारणार आहे. त्यात १५९ जातींचे कमळ पुष्प व २५० जातींचे गुलाब असतील. या उद्यानामुळे नागपूरच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनुमान स्पोर्ट्स ॲकेडमी व जे. डी. स्पोर्ट्स यांच्यातर्फे ‘स्वीमथॉन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी, डॉ. उगेमुगे उपस्थित होते. शहरात दिव्यांगांसाठीही एक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने जागा दिली आहे. १० ते १२ कोटींचा निधी केंद्र शासन देत आहे. येथे ब्रेन लिपित लिहिलेल्या विविध गोष्टी असतील.

दररोज एक लाख विद्यार्थी मैदानावर खेळले पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात आता खेळाचे मैदाने तयार करण्यात येत आहेत. या मैदानावर खेळण्याची संधी त्या त्या भागातील खेळाडूंना मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World class park to be realized in nagpur nitin gadkari amy
First published on: 14-08-2022 at 14:47 IST