यशोधरानगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित

१२ जूनला केबिनमध्ये बोलावून मेश्राम यांनी २४ वर्षीय महिला होमगार्डशी अश्लील चाळे केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : तीन महिला गृहरक्षकांचा विनयभंग केल्याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना निलंबित केले.

१२ जूनला केबिनमध्ये बोलावून मेश्राम यांनी २४ वर्षीय महिला होमगार्डशी अश्लील चाळे केले. तिला महागडे गिफ्ट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. अन्य दोन महिला होमगार्डशीही मेश्राम यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. गुरुवारी तीन महिला गृहरक्षकांनी पोलीस उपायुक्त  निलोत्पल यांच्याकडे तक्रार केली. निलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मेश्राम यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीच्या अध्यक्षा पोलीस उपायुक्त विनीता शाहू या करीत आहेत. मेश्राम यांना सरकारी पिस्तूल व वर्दी पोलीस मुख्यालयात जमा करून त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांमुळे शहर पोलीस दलाची प्रतीमा मलीन होत असून पोलीस आयुक्तांसमोर ही प्रतिमा उजाळण्याचे मोठे आव्हान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Yashoda nagar police inspector suspended zws

ताज्या बातम्या