अमरावती : जिल्ह्यात काही संघटनांकडून त्रिशूळाचे वाटप करण्यात येत आहे. पण, हे त्रिशूळ नसून गुप्तीसारखे शस्त्र आहे. या सर्व गोष्टी तत्काळ थांबवल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा भविष्यात हिंसक घटना घडण्याची भीती आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच धोक्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, त्रिशूळाचे वाटप काही संघटनांकडून करण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अद्याप यासंदर्भात आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, पण पोलिसांनी तत्काळ स्वत:हून या घटनांची दखल घेऊन संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजे. एकीकडे, राज्यात बांगलादेशी शिरले असल्याचा आरोप भाजपचे नेते करीत आहेत. राज्यात तर भाजपचेच सरकार आहे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक असताना बांगलादेशी घुसखोर शिरलेच कसे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, त्रिशूळाच्या नावावर गुप्तीसारखे शस्त्र वाटण्यात येत असताना पोलिसांनी गप्प राहता कामा नये, या शस्त्रांचे कुठे-कुठे वाटप झाले, हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. अमरावती जिल्ह्याला आणि राज्याला याने हिंसक वळण लागले, तर त्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. महायुतीतील पक्ष लोकसभा निवडणुकीच्या वेळची मतदार यादी नाकारतात, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. लोकशाहीला मारण्यासाठी हे सगळे काम सुरू आहे. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा आशावाद यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

BJP leader Kirit Somaiya alleged scam of issuing birth certificates to 15 845 Rohingyas
अकोला : बांगलादेशी रोहिंग्यांना प्रमाणपत्र; सोमय्यांनी पोलिसांना दिले पुरावे, एका गुन्ह्यात तीन आरोपींना…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
beggar fined loksatta article
आता भीक मागणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही दंड, पण यातून साध्य काय होणार?
pune crime news in marathi
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप

हेही वाचा… एसटीच्या भाडेवाढीने सुट्या पैशाचा भावही वाढला… प्रवासी- वाहकांमध्ये…

डॉ. अनिल बोंडे यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, हे दुर्देव आहे की यशोमती ठाकूर यांनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. यांना मुसलमानांच्या घरातले सत्तूर आणि कोयते दिसत नाही का? धार्मिक विधी म्हणून कोणी त्रिशूळ वाटत असेल तर खरोखर द्यायला पाहिजे. हिंदूंच्या घरात साप मारायला साधी काठी नसते. त्यामुळे स्व रक्षणासाठी जर घरात त्रिशूळ ठेवत असेल तर ते आवश्यक असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

Story img Loader