यवतमाळ : पारधी आणि आदिवासी समाजातील मुलींकरिताच्या ‘आम्ही साऱ्या सावित्री’ या वसतिगृहातील ३३ चिमुकल्यांनी बाल वाचनालयाचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. एस.एल. फाऊंडेशनच्या प्रेरणा व पुढाकारातुन सुरु झालेल्या सेवा उपक्रमाची मुहुर्तमेढ नुकतीच झाली. वाचन प्रेरणा चळवळीतून व्यक्तिमत्व विकास तसेच गरजूंना रोजगार, स्वयंरोजगार मिळण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
पारधी फासेपारधी विकास बहुउद्देशिय संस्थेमार्फत २०१९ पासून वाघाडी येथील ‘आम्ही साऱ्या सावित्री’ हे पारधी व आदिवासी समाजातील मुलींसाठीचे वसतीगृह सुरू आहे. ईसु माळवे आणि पपिता माळवे हे दांमप्त्य सेवाभाव म्हणून या उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित समाजातील चिमुकल्यांना शिक्षणासह संस्कार मिळावे तसेच त्यांचा सांभाळ करून त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळण्याच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीने वसतीगृहाचे मोठे नुकसान झाले होते. यादरम्यान दाते कॉलेजमधील १९९४-९५ मधील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेलया एस.एल. फाऊंडेशन या संस्थेने या वसतीगृहास मदतीचा हात दिला. वसतीगृहास किराणा, मुलींना शालेय साहित्य, खाऊ, कपडे, साहित्य वसतीगृहास देण्यात आले.

एस.एल. फाऊंडेशनने वसतीगृहाच्या माध्यमातून येथे बाल वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाचन संस्कृती रुजावी, स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीने विद्यार्थींनींचा पाया लहानपणापासूनच भक्कम व्हावा. त्यांना रोजगार, स्वयंरोजगारासह मूल्य शिक्षणाचे धडे मिळावे म्हणून ईसु माळवे आणि पपिता माळवे यांच्या हस्ते या बाल वाचनालयाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ. शिवम जोशी, डॉ. सचिन जयस्वाल, सुनील भुसार, उमेश कपिले, दिपक देशपांडे आदी उपस्थित होते.

sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
Ganesh Mandals, Satara, Lawsuits Satara,
सातारा : ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या २९ गणेश मंडळांवर खटले
prarthana foundation information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा, वृद्धांचा निवारा
gulab puris controversial ganpati decoration
गुलाब पुरींच्या गणपतींच्या वादग्रस्त देखाव्याबाबत उत्सुकता
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Three from Bramhapuri appointed as sub-inspectors of police
चंद्रपूर : ब्रम्हपुरीतील तिघांची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी, हलाखीच्या परिस्थितीवर मात

हेही वाचा…अमरावती : माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा… ‘तो’ विषाची बाटली घेऊन ‘तिच्या’ घरी पोहोचला अन्…

आम्ही साऱ्या सावित्री या वसतीगृहात गतवर्षी गुरुपौर्णिमेपासून एस.एल. फाऊंडेशनने गुरुवंदना उपक्रम सुरु केला याअंतर्गत फाऊंडेशनचे सदस्य तथा संबंधित विषयांतील तज्ज्ञ रविवारी उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित घटकांना विविध विषयांचे शिक्षण, प्रशिक्षण देतात. फाऊंडेशनने आम्ही साऱ्या सावित्री या वसतीगृहासह अन्य सामाजिक संस्थांसमवेत वाघाडी येथे ८० वृक्षांचे रोपण केले आहे. स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानातील सक्रिय सहभागासह अनेक पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. वसतिगृह परिसरात गतवर्षी काही रोपटे लावले असून यंदा विविध जातींच्या ३३ वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रयासवन येथेही वृक्षांचे पालकत्व फाऊंडेशनने घेतले आहे. फाऊंडेशनचे अश्विन सव्वालाख यांच्यासह प्रचिती काळे, जीवन पळसोकर, सुचिता गुघाणे, अतुल टाके, अविनाश बोबडे, आशिष गायेकी, विनोद एकुंडवार, विलास लोहकरे, योगिता गुल्हाने, वैशाली पाटणे, आरती कामघंटे, वीणा गुल्हाने आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा…साधू संत येती घरा… गजानन महाराजांची पालखी आज विदर्भात; पहिला मुक्काम जिजाऊंच्या माहेरी…

सहयोगातून समाजसेवा

एस.एल. फाऊंडेशनच्या सदस्य वर्षातून एकदा आपला ऐच्छिक सहयोग निधी फाऊंडेशनकडे जमा करतात. याद्वारे आतापर्यत यवतमाळात किमान २५ पेक्षा जास्त ठिकाणी आर्थिक आणि वस्तु स्वरुपात मदत करण्यात आली आहे. महिन्यातून एका रविवारी गरज असलेल्या ठिकाणी महिन्याभरा वाढदिवस झालेल्या सदस्यांचे वाढदिवस सामाजिक उपक्रम घेवून साजरे केले जातात.