यवतमाळ : जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेले खुनाचे सत्र कायम आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आर्णी व पांढरकवडा तालुक्यात दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. दारूच्या नशेत सासरा शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात जावयाने काठीने डोके फोडून सासऱ्याचा खून केला. ही घटना आर्णी तालुक्यातील म्हसोला येथे गुरुवारी रात्री घडली. तर, पांढरकवडा शहरापासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या वाई फाट्याजवळ तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आला.

इस्तारी मधुकर नेवारे (४२, म्हसोला) असे आर्णी तालुक्यातील मृताचे नाव आहेत. रवींद्र देवराव बोटरे (३२, रा. म्हसोला), असे मारेकरी जावयाचे नाव आहे. म्हसोला येथे गुरुवारी रात्री इस्तारी नेवारे हा दारूच्या नशेत घरी आला. मुलगी निकीता रवींद्र बोटरे हिला जेवण मागितले. स्वयंपाक करून जेवण देते, असे म्हणताच सासर्‍याने मुलगी व जायवायला शिवीगाळ करणे सुरू केले. त्यामुळे मुलीने स्वयंपाक घराचा दरवाजा बंद केल्याने दरवाजाला लाथा मारणे सुरू केले. दरवाजाला लाथा का मारता, असा जाब विचारल्याने दोघांत वाद झाला. संतप्त जावयाने सासर्‍याच्या डोक्यात लाकडी काठीने मारल्याने तो जागीच गतप्राण झाला. आर्णी पोलिसांनी रवींद्र बोटरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फरार जावयाला पोलिसांनी आज शुक्रवारी दाभडी-म्हसोला शेतशिवारातून अटक केली.

Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल
indapur murder case marathi news, indapur murder accused arrested by police marathi news
इंदापूर हत्या प्रकरण: मैत्रिणीला भेटायला आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला!

हेही वाचा – अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर…

हेही वाचा – चिखलीतील ‘जिनिंग’मध्ये आग, १० लाखांचे नुकसान

दुसऱ्या घटनेत, पांढरकवडा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वाई फाट्याजवळ तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सचिन तुकाराम कुनघाटकर (२३, रा.चंद्रशेखर वार्ड पांढरकवडा), असे मृताचे नाव आहे. गवराई येथील पोलीस पाटील यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फोन करून एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने, ठाणेदार अमोल माळवे, सहायक पोलीस निरीक्षक गजभिये यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात आरोपी अज्ञात आहे. खुनाचे नेमके कारण समोर आले नाही. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गठीत करण्यात आले आहे. या खुनाची माहिती मिळताच नातेवाईकांसह मित्रांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपीस अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. एसडीपीओ वैजने यांनी समजूत काढत आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला.