scorecardresearch

Premium

शिंदे गटासाठी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अडचणीचा ठरणार! भाजपसंबंधित खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

Yavatmal-Washim Lok Sabha constituency
काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित एका खासगी संस्थेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केले होते.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

वाशीम : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत नवीन चेहरे उतरू शकतात. राज्यात भाजपकडून ‘मिशन ४५’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. या मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भाजपही ताकदीने मैदानात उतरला आहे.

congress partyCongress preparations for Lok Sabha seat allocation , Congress ,
काँग्रेसची लोकसभा जागावाटपाची पूर्वतयारी; शनिवारपासून विभागवार आढावा बैठका
uddhav thackrey in kokan mashal symbol
उद्धव ठाकरे गटाकडून कणकवली विधानसभा मतदारसंघात  ६ ऑक्टोबर रोजी ‘होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न’
bjp,
यवतमाळ वाशीम लोकसभेसाठी भाजप आग्रही; शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार

काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित एका खासगी संस्थेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातील निष्कर्ष शिंदे गटासाठी धक्कादायक ठरला आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीचा ठरणार असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले असून शिंदे गटाने उमेदवार बदलावा, अन्यथा भाजप उमेदवार उभा करेल, अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर झाल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा-“शाळेची जमीन परत करा,” उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश; भूमाफियांना सणसणीत चपराक

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून भाजप लढेल की शिंदे गट, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, इच्छुकांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. भाजप नेते प्रा. प्रवीण पवार यांचे वाशीमपासून यवतमाळपर्यंत बॅनर झळकले आहे. त्यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रा. प्रवीण पवार वंचितकडून लढले होते. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता जनसंवाद यात्रा काढणार आहेत. त्यांच्या बॅनरवर ‘अब की बार प्रवीण पवार’ असे लिहिण्यात आले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yavatmal washim lok sabha constituency will be a problem for shinde group pbk 85 mrj

First published on: 02-10-2023 at 14:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×