चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे (३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतकरी शेतात गुरेढोरे बांधून त्याच्या रखवालीसाठी जात होता. त्याचे शेत चिमूर-वरोरा या राज्य महामार्गाला लागून आहे. मंगळवारी रात्री अंकुश शेतावर गेला, मात्र बुधवारी सकाळी घरी परत आला नाही. त्यामुळे लहान भाऊ सकाळी शेतावर गेला असता त्याला अंकूशचा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत अंकुश याच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या जखमा होत्या. वन विभागाने पंचनामा करून वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याचे सांगितले.

PM Narendra Modi
नरेंद्र मोदींचा मोठा दावा, “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणारच, हे घडल्यावर मला…”
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
PM Modi Sabha
PM Modi Roadshow in Mumbai : “काँग्रेसने फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण केलं”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
bhushan kadu reveals why he left maharashtrachi hasya jatra
“हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
As many as three lakh fake notes brought from Bangladesh
धक्कादायक! बांगलादेशातून आणल्या तब्बल तीन लाख बनावट नोटा; आंतरराज्यीय टोळी…
Access of poor tribal students to law university due to timely help Nagpur
ऐनवेळी मिळालेल्या मदतीमुळे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांंचा विधि विद्यापीठात प्रवेश
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO