भद्रावती येथील खुशबू योगेश सारडा या युवतीला सोनी टीव्हीवरील महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी खुशबू हिने अभिताभ बच्चन यांना ग्रामोदय संघ येथे निर्मित चिनी मातीच्या वस्तू भेट स्वरूपात दिल्या.

हेही वाचा >>> गडचिरोली: अवैध दारूविक्री ते ‘खाण माफिया’; अधिकारी व नेत्यांना ‘लक्ष्मी’दर्शन घडवण्यात तरबेज ‘गोलू’ आहे तरी कोण? सविस्तर वाचा…

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

आयुध निर्माण कारखान्यात कार्यरत व स्थानिक रजवाडा टाऊनशिप येथील निवासी योगेश सारडा व डॉ. ममता सारडा यांची कन्या खुशबू हिला ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.  अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमात पहिल्या दहा स्पर्धकांत खुशबू हीची निवड झाली होती. याप्रसंगी सारडा कुटुंबीयाच्या वतीने अमिताभ बच्चन यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये चिनी मातीपासून तयार केलेला तबला, हार्मोनियम तथा मूर्तीचा समावेश होता.  

हेही वाचा >>> नागपूर : देशातील रस्ते आता विमा, भविष्य निर्वाह निधीच्या पैशातून; नितीन गडकरी यांची माहिती 

इलेक्ट्रॉनिक अभियंता असलेली खुशबू पुणे येथे एका कंपनीत प्रोजेक्ट ऑफिसर पदावर कार्यरत आहे. संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध भद्रावतीच्या ग्रामोदय संघातील वस्तूंना देशविदेशात मागणी आहे. या वस्तू देताच अमिताभ बच्चन यांनी सारडा कुटुंबाचे आभार मानले. ‘कौन बनेगा करोडपती’चा हा एपिसोड डिसेंबर महिन्यात सोनी वाहिनीवर प्रसारित झाला. खुशबू या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेंद्र कुमार चौधरी, उपाध्यक्ष विजय श्रीवास्तव यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान खुशबू हीची अंतिम स्पर्धकांत निवड झाली नाही. त्यामुळे तिला ‘कौन बनेगा करोडपती’ हा खेळ खेळता आला नाही.