पोलिसांच्या मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

मात्र मारहाणीची कोणतीही घटना झाली नसल्याचे पोलिसांना कळाले.

नागपूर : पोलिसांनी मारहाण केल्यामुळे एका ३८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेकडो लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

महेश शालिकराम राऊत असे मृताचे नाव आहे. तो ताजश्री शोरुममध्ये लेखापाल होता. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास महेश याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. एका गतिमंद इसमाला शेजारची महिला मारहाण करीत असल्याचे त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर पोलिसांना कळवले. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे चार्ली किशोर सेनाड व प्रवीण आलम तेथे गेले. मात्र मारहाणीची कोणतीही घटना झाली नसल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी महेशच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. महेशचा मोबाईल बंद होता. ट्रू कॉलरमध्ये महेशचे नाव आले. एका शेजाऱ्याने महेश बाजूलाच राहात असल्याचे सांगितले. पोलीस त्याच्या घरी गेले व चौकशी केली. पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती का देतो, असे म्हणून फरफटत घराबाहेर नेऊन मारहाण केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man commits suicide after being beaten by police akp