‘पबजी’मुळे तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन आत्महत्या

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पबजीमुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाईनगर परिसरात घडली. शुभम लालाजी यादव (२४) रा. रमाईनगर, नारी रोड, कपिलनगर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

लालाजी यादव यांचे नारी रोडवर छोटेसे गॅरेज आहे. शुभमला मोबाईलवर पब्जी खेळण्याचे वेड होते. काही दिवसांपासून शुभम तणावात होता. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्याने कुटुंबीयांसोबत जेवण केले व आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. अकरा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत तो मोबाईलवर पब्जी खेळला आणि वॉट्?सअ‍ॅपवर मित्रांशी संवादही साधला. त्यानंतर त्याने खोलीचे दार बंद केले. बारा वाजेच्या सुमारास त्याची बहीण त्याच्या खोलीत गेली असता शुभम पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शुभमला मेयोत दाखल केले. मात्र, तोपर्यंत शुभमचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man commits suicide due to pubg abn

ताज्या बातम्या