यवतमाळ : येथील आझाद मैदान परिसरात असलेल्या शासकीय जलतरण तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अंकित भोयर (२५), रा. सेजल रेसिडेंसी पाटीपुरा, असे मृत युवकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकित नेहमीच पोहण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत होता. त्याला पोहण्याचा अनुभव होता. यावर्षी शनिवारी सायंकाळी तो पहिल्यांदाच पोहायला आला होता. शनिवारी सकाळीच त्याने प्रवेश निश्चित करून सायंकाळी ६ ते ७ वाजताची बॅच निवडली. मात्र, पहिल्याच दिवशी त्याचा घात झाला.

हेही वाचा…नागपूर : अंबाझरी तलावाबाबत गांभीर्याचा अभाव

स्विमींग पुलमध्ये थेट आठ फूट खोली असलेल्या भागाच्या काठावर जाऊन त्याने पाण्यात उडी घेतली. लगेच तो बुडू लागला. त्याची अवस्था पाहून तातडीने बाजूच्या दोघांनी त्याला बाहेर घेतले. यावेळी पोट दाबून अंकितच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंकितला उलटी झाली. त्याच्या पोटातून अन्न बाहेर आले. तो अत्यवस्थ असल्याने तातडीने लगतच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी अंकितला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी अंकितला मृत घोषित केले. अंकितचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला, की दुसरे कुठले कारण आहे हे आता शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man drowns in yavatmal government swimming pool tragedy strikes on first day of admission nrp 78 psg