scorecardresearch

वर्धा:‘समृद्धी’वरील अपघाताची मालिका कायमच; भरधाव कार उलटली, युवतीचा मृत्यू

‘समृद्धी’ महामार्गावरील अपघाताची मालिका अद्यापही कायमच आहे. नागपुरातील लग्नसमारंभ आटोपून गावी परतणाऱ्या युवतीचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला.

वर्धा:‘समृद्धी’वरील अपघाताची मालिका कायमच; भरधाव कार उलटली, युवतीचा मृत्यू

‘समृद्धी’ महामार्गावरील अपघाताची मालिका अद्यापही कायमच आहे. नागपुरातील लग्नसमारंभ आटोपून गावी परतणाऱ्या युवतीचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली. यात पूजा प्रेमचंद (रवी) दरवळकर (२५) रा. वायगाव (निपाणी) हिचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरुणा प्रकाश राऊतकर, अनुप प्रकाश राऊतकर, अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नागपूर: शेतातील गुप्तधनाची आस, तांत्रिकांद्वारे मध्यरात्री मंत्रपाठ…

पूजाच्या मामेबहिणीचे नागपूर येथील मानेवाडा येथे लग्न होते. याकरिता ती आई-वडिलांसह नागपुरात आली होती. लग्नानंतर ती नागपुरात थांबली आणि आई-वडिलांना परत जाण्यास सांगितले. आज सकाळी ती मावशी अरुणा प्रकाश राऊतकर व मावस भाऊ अनुप प्रकाश राऊतकर, रा. धामणगाव, शिवाजी वॉर्ड, जि. अमरावती यांच्यासह एमएच २७-एसी-९७४७ क्रमांकाच्या वाहनाने परतीला निघाली. केळझरलगत समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात पूजाचा मृत्यू झाला. पूजा पुणे येथील संगणक कंपनीत नोकरी करीत होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 20:41 IST
ताज्या बातम्या