पाचपावली परिसरात मित्राचाच खून ; अंमली पदार्थाचा व्यवहार कारणीभूत?

हा प्रकार अंमली पदार्थ वा ड्रग्जच्या तस्करीच्या पैशांच्या वाटाघाटीतून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

murder
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : पाचपावलीतील नवा नकाशा परिसरात गुरुवारी सकाळी चार मित्रांनी आपल्या मित्राचा खून केला. हा प्रकार अंमली पदार्थ वा ड्रग्जच्या तस्करीच्या पैशांच्या वाटाघाटीतून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिताफीने तपास करत लाखनीतून सात आरोपींना अटक केली. भोजेश ऊर्फ गोल्डी शंभरकर (२४) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

गोल्डी  हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्याकांडाच सूत्रधार जहाँगीर खान याच्याशी त्याची मैत्री होती. शारीक खान, मोहम्मद फैयाज आणि नियाज शेख यांच्याशी गोल्डीची ओळख झाली. जहाँगिर खान आणि गोल्डीने गांजा विक्री आणि तस्करी सुरू केली होती. त्यातून कमावलेल्या पैशातून दोघांनी ड्रग्ज विक्रीही सुरू केली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्स विक्रीतून आलेल्या ८० हजार रुपयांच्या नफ्यातील वाटा जहाँगिरने गोल्डीला दिला नव्हता. त्यामुळे दोघांत काही दिवसांपासून वाद सुरू होता. गोल्डी पैशासाठी तगादा लावत होता तर जहॉंगिर हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. त्यातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान प्राथमिक तपासात गुरुवारी सकाळी आठ वाजता चारही आरोपी गोल्डीच्या घरी गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सगळे नवा नकाशा परिसरात गेले. तेथे चौघांनी गोल्डीला घेरत चाकूने हल्ला करत त्याचा खून केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youth murdered by 4 friends in panchpaoli area zws

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या