scorecardresearch

नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली.

नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या युवकाने दगडाने ठेचून वाटसरू युवकाचा खून केला. ही घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजता वीटाभट्टी चौकात घडली. अद्याप मृत युवकाची ओळख पटली नाही.

आरोपी सतीश पांडुरंग मुळे (२७, रा. धम्मदीपनगर) हा अट्टल दारुडा आहे. तो बुधवारी दुपारी दीड वाजता दारुची बाटली घेऊन वीटाभट्टी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडाखाली दारु पीत बसला होता. यादरम्यान ३० वर्षीय अनोळखी युवक रस्त्याने जात होता. त्याने सतीशला बघून ‘बेवडा’ म्हटले. त्यामुळे सतीशने त्याला तेथून जाण्यास सांगितले.

हेही वाचा : खोट्या देयकाच्या आधारे कोट्यवधींची करचोरी, नागपूरच्या व्यापाऱ्याला अटक

मात्र, त्या युवकाने जाण्यास नकार दिला आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या सतीशने त्या युवकाचा दगडाने ठेचून खून केला. रस्त्याने जाणाऱ्यांनी ही घटना बघितली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशोधरानगरचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या