नागपूर : 'बेवडा: म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून | Youth stoned to death for saying alcoholics in nagpur | Loksatta

नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली.

नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या युवकाने दगडाने ठेचून वाटसरू युवकाचा खून केला. ही घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजता वीटाभट्टी चौकात घडली. अद्याप मृत युवकाची ओळख पटली नाही.

आरोपी सतीश पांडुरंग मुळे (२७, रा. धम्मदीपनगर) हा अट्टल दारुडा आहे. तो बुधवारी दुपारी दीड वाजता दारुची बाटली घेऊन वीटाभट्टी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडाखाली दारु पीत बसला होता. यादरम्यान ३० वर्षीय अनोळखी युवक रस्त्याने जात होता. त्याने सतीशला बघून ‘बेवडा’ म्हटले. त्यामुळे सतीशने त्याला तेथून जाण्यास सांगितले.

हेही वाचा : खोट्या देयकाच्या आधारे कोट्यवधींची करचोरी, नागपूरच्या व्यापाऱ्याला अटक

मात्र, त्या युवकाने जाण्यास नकार दिला आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या सतीशने त्या युवकाचा दगडाने ठेचून खून केला. रस्त्याने जाणाऱ्यांनी ही घटना बघितली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशोधरानगरचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची गरुडझेप, मिळवले तब्बल २१ लाखापर्यंतचे पॅकेज

संबंधित बातम्या

ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही; हंसराज अहिर
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
प्रतिभावंत चरित्रकार ‘धनंजय कीर’
नागपूर : ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला १४ आणि १५ ऑगस्टला नागरिकांसाठी खुला
नागपूर : साहित्यिक संमेलनात फक्त भाडे वसूल करायला येतात – डॉ. सुधीर रसाळ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
हैद्राबादच्या निजामाच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?