भंडारा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या गांधी चौकात काल दि. २८ मे रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान हत्येचा थरार उडाला. भर चौकात दुर्गा लस्सी सेंटर चालक अमन नंदुरकर या २३ वर्षीय (रा. गांधी चौक) तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना पकडून बेदम चोप दिला. यात तिघेजण जखमी झाले असून, अभिषेक साठवणे (१८) रा. आंबेडकर वॉर्ड गंभीर जखमी झाला होता. अमनचा मारेकरी अभिषेक साठवणे याचा आज सकाळी ११.१५ मिनिटांनी नागपूर मेयो येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक अमन गांधी चौकातील आदर्श टॉकीज समोर दुर्गा लस्सीचे दुकान चालवत होता. शनिवारी अमनच्या लस्सी सेंटरवर विकी मोगरे आणि ईएल चर्च रोड येथील विष्णू उर्फ बा याने अमन सोबत भांडण करून त्याला चोप दिला. भांडण झाल्यावर अमन दुकान बंद करून घरी गेला. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विकी मोगरे, विष्णू उर्फ बा त्याच्या काही सहकाऱ्यांसह वाद मिटवण्यासाठी अमनच्या दुकानात पोहोचले. तेथे वाद मिटण्याऐवजी वाद विकोपाला गेला. प्रकरण एवढे वाढले की, आरोपी अभिषेक साठवणे याने रागाच्या भरात त्याच्या जवळील चाकू अमनच्या पोटात भोकसला आणि वार केले. अमन रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडला. घटनास्थळी उपस्थित अमनचे वडील, काका, त्याचा मित्र आकाश कडूकर व इतरांनी अभिषेकच्या हातातील चाकू हिसकावून परिसरातील जमावाने अभिषेकला पकडले व मारहाण केली. या दरम्यान त्याचे साथीदार पळून गेले.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

हेही वाचा – नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, गांजाप्रकरणी कर्मचाऱ्यांना नोटीस

जमावाने आरोपीला हॉस्पिटलमध्ये बेदम मारहाण केली. लोकांनी अमन आणि अभिषेकला जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेले, तिथे डॉ. साकुरे यांनी अमनला मृत घोषित केले. जमावाने संयम सोडला आणि हल्लेखोर अभिषेकला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी वॉर्डाबाहेर धाव घेतली आणि रुग्णालयाच्या पोलीस चौकीत तैनात असलेल्या जवानांना पाचारण केले. पोलिसांनी लोकांना शांत करून परिस्थिती हाताळली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी आणि पोलीस निरीक्षक सुभाष बारसे हेही हॉस्पिटल आणि घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी हल्लेखोर अभिषेक साठवणे याला अटक करण्यात आली व त्याला नागपूर जिमसी येथे रेफर करण्यात आले आहे. मारेकरी अभिषेक साठवणे याचा आज सकाळी ११.१५ मिनिटांनी नागपूर मेयो येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी गांधी चौक आणि जिल्हा रुग्णालयात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चौकात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.