scorecardresearch

Premium

अकोल्यात ‘शुन्य कचरा’ उपक्रम; महापालिकेकडून १४ ठिकाणी…

केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाडा २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे.

zero waste initiative in akola
अकोला महानगर पालिकेकडून १ ऑक्टोबरला ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’मध्ये शुन्य कचरा उपक्रम

अकोला : स्वच्छता पंधरवाड्यांतर्गत अकोला महानगर पालिकेकडून १ ऑक्टोबरला ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’मध्ये शुन्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १४ ठिकाणी नियोजन करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाडा २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण

garbage on road again in uran on gandhi Jayanti after swachhta abhiyaan
उरणमध्ये स्वच्छता अभियानाचा एक दिवस एक तासा पुरताच ठरला; गांधी जयंतीला पुन्हा कचरा रस्त्यावरच
Government decision of manpower supply through outsourcing
कंत्राटी नोकर भरतीविरोधात आंदोलने, ८२१ जागांवर बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठ्याच्या शासन निर्णय
cleanliness campaign on sunday in mumbai
मुंबईत रविवारी लोकसहभागातून स्वच्छता
government job office
शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय

१ ऑक्टोबरला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत स्वच्छता अभियान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोला महापालिकास्तरावर ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी अकोला रेल्वेस्थानक, बसस्थानक, हुतात्मा स्मारक, जनता बाजार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस लॉन, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी विद्यापीठ, महाबीज, असदगड, गोरक्षण मार्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आदी भागांमध्ये स्वच्छता करण्यात येईल. या मोहिमेसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zero waste initiative on 1st october by akola municipal corporation ppd

First published on: 28-09-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×