नागपूरमध्ये हरितालिका पुजनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सावंगी देवळी गावात हरतालिका पुजनासाठी नदीकिनारी गेलेल्या सहा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंदाताई नागोसे (४५), प्रिया राऊत (१७), जान्हवी चौधरी (१३), पुजा दादमल  (१७), पुनम दादमल  (१८) , प्रणाली राऊत (१६)  अशी या मृत महिलांची नावे आहेत. पोलिसांनी या सहाही जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.

हरतालिकेनिमित्त गौरीपुजनासाठी महिला सावळी गावातून वाहणा-या ओढ्याजवळ महिला मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. मंदातई नागोसे आणि अन्य पाच जण पाण्यात हरतालिका पुजन करण्यात उतरल्या. मात्र  पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि हे सर्व जण ओढ्यातील खोलगट भागात ओढल्या गेल्या.   मृतांमध्ये  एका लहान मुलीचाही समावेश आहे.  घटनेचे वृत्त कळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. पोलिसांना अथक प्रयत्नानंतर सहाही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. मात्र या घटनेमुळे सावंगी देवळी गावात शोककळा पसरली आहे.