News Flash

सर्प दंशामुळे दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नाशिकमधील देवळा तालुक्यातील घटना

सर्प दंशामुळे दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
शुभम अशोक शेळके

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वाखारी येथे विषारी साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम अशोक शेळके (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शुभम हा आईजवळ झोपला होता. यावेळी झोपेत असतानाच विषारी सापाने त्याच्या कानाला दंश केला. त्याने आईला काहीतरी चावल्याचे सांगितले. मात्र किडा वगैरे चावला असेल म्हणून आईने दुर्लक्ष केले.

सकाळी शुभम उठला नाही म्हणून त्याची आई त्याला उठवण्यास गेली. त्यावेळी शुभम निपचित पडल्याचे दिसले. मुलाच्या आईने त्याला तत्काळ देवळा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी देखील शुभम उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 8:38 pm

Web Title: 10 year old boy lost his life due to snake bite in nashik
Next Stories
1 नाशिकमध्येही समृद्धी योजनेत खोडा!
2 ‘जीएसटी’च्या धसक्याने गृहखरेदीत वाढ
3 गुन्हेगारी घटनांनी पिंपळगाव परिसर हादरला
Just Now!
X