07 July 2020

News Flash

Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ४८ तासांत करोनाचे १५९ नवे रुग्ण

मालेगाव महापालिका हद्दीत १४ रुग्ण आढळले.

नाशिक : टाळेबंदीचा चौथा टप्पा संपत असतांना जिल्ह्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४८ तासात १५९ ने वाढली आहे. शहरात नव्याने १७ रुग्ण आढळले असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक महापालिका हद्दीत शुक्रवारी असलेल्या १७८ आकडय़ात शनिवारी दुपापर्यंत पाच नवीन रूग्णांची भर पडली. सातपूर येथील वृंदावन नगर गार्डन परिसरातील ४३ वर्षांची व्यक्ती आणि त्याची ३७ वर्षांची पत्नी, मखमलाबाद रोड येथील २० वर्षांचा युवक, िदडोरी रोडवरील प्रयाग ग्रीन सोसायटीतील २९ वर्षांचा  युवक, पंचवटीतील २८ वर्षांचा युवक यांचा समावेश आहे. ५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून महापालिका हद्दीतील ३४ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

मालेगाव महापालिका हद्दीत १४ रुग्ण आढळले. यामध्ये गुलाब पार्कमधील २३ आणि २१ वर्षांची महिला, अब्दुला नगरातील ४० वर्षांची महिला, १९ वर्षांचा युवक, आयेशानगरातील ३७, ४२ आणि ३९ वर्षांची व्यक्ती तसेच कुंभार वाडय़ातील ८० वर्षांची आणि रंजनपुरा येथील ४० वर्षांची महिला, मुंबई रेल्वेतील ३२ आणि २९ वर्षांचे युवक, व्यंकटेश नगर येथील ३५ वर्षांची व्यक्ती, हजार खोलीतील २३ आणि नुर बाग येथील २७ वर्षांची युवती करोनाबाधित आढळले आहेत. मालेगावमधील मृतांची संख्या ५२ आणि जिल्हातील संख्या ६१ झाली आहे.

जिल्ह्याच्या इतर भागातही सात नवे रुग्ण आढळले. यामध्ये देवळा तालुक्यातील दहिवड येथील २८ वर्षांचा युवक, सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ४४ वर्षांची व्यक्ती, वावीतील २२ वर्षांची युवती, सिन्नरच्या फुलेनगरातील ३९ वर्षांची महिला, मानोरीतील ९० वर्षांची व्यक्ती आणि येवला येथील मुलतानपुरा परिसरातील २८ वर्षांच्या युवकाला करोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपापर्यंत नाशिक महापालिका हद्दीत १२५ जण उपचार घेत असून ग्रामीण मध्ये ४६ आणि मालेगाव मध्ये ११४ रूग्ण उपचार घेत आहेत.

गरोदरांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

करोना बाधित गरोदर महिलांच्या उपचारासाठी गैरसोय होत असल्याने त्यांच्या साठी स्वतंत्र उपचार व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी केली आहे. गरोदर महिलांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. सध्या बाधित आढळून आलेल्या गरोदरांना इतर रुग्णांची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच दाखल केले जाते. अशा स्थितीत प्रसूती तसेच त्यांच्यावरील उपचार करण्यास मर्यादा येतात. गुरूवारी अशा प्रकारची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच तीन बाधित महिलांना तातडीने नाशिकला हलविले गेले. यामध्ये जाणारा वेळ हा गरोदर महिलांच्या आरोग्यास धोका पोहचवणारा असू शकतो. यासाठी गरोदर महिलांसाठी स्वतंत्र करोना रुग्णालय सुरू करावे. त्यासाठी सध्या बंद असलेल्या वाडिया रुग्णालयात व्यवस्था करण्याची मागणी बोरसे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 2:14 am

Web Title: 159 new corona patients in 48 hours in nashik district zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 CCTV Video : नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर; हल्ल्यात दोघे जखमी
2 नाशिक जिल्ह्यात १०७३ रुग्ण
3 रस्त्यांच्या कामांसाठी कर्जरोखे
Just Now!
X