महाराष्ट पोलीस प्रबोधिनीसह प्रशासन सतर्क

नाशिक : शहरासह जिल्ह्य़ात करोना प्रादुर्भाव कमी होत असताना येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील १६६ प्रशिक्षणार्थी तसेच दोन प्रशिक्षकांना करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्रशासनासह आरोग्य विभाग या प्रकारामुळे सतर्क झाले आहे. संसर्ग अधिक फै लावू नये म्हणून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या माध्यमातून उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झालेले तसेच पोलीस दलातील अन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. शतकाची परंपरा असलेल्या या संस्थेत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन के ले जाते. राज्यात करोनाचा संसर्ग फै लावण्यास सुरुवात होताच पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर जाणे-येणे पूर्णत:  बंद करण्यात आले होते. या ठिकाणी सद्य:स्थितीत ६६९ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक सर्व साहित्य प्रबोधिनीच्या वतीने देण्यात येत आहे. करोना महामारीमुळे येथील बाह्य़ प्रशिक्षण बंद करण्यात आले होते; परंतु शिथिलीकरणाची प्रक्रि या सुरू झाल्यानंतर प्रबोधिनीनेही प्रशिक्षणार्थीना मैदानावरील प्रशिक्षण देण्यास सुरुवात के ली. १६ डिसेंबर रोजी मैदानावर प्रशिक्षण सुरू असताना एका प्रशिक्षणार्थीला सर्दी, खोकल्याचा त्रास झाला. त्याला त्वरित प्रबोधिनीच्या दवाखान्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले. घशातील द्रव्याचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल करोना सकारात्मक आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ६६९ प्रशिक्षणार्थीची तपासणी करण्यात आली. त्यांना शिकविणाऱ्या दोन प्रशिक्षकांचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीत १६६ प्रशिक्षणार्थी आणि दोन प्रशिक्षक करोनाबाधित आढळून आले.

करोनाबाधित प्रशिक्षणार्थीवर ठक्कर डोम येथील करोना उपचार के ंद्रात दाखल करण्यात आले आहे. करोनाचा शिरकाव झाल्याने प्रबोधिनीतील अधिकारी, कर्मचारी सर्वाची तपासणी करण्यात आली आहे.

आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन होत असल्याचा दावा प्रबोधिनीकडून करण्यात आला आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव फै लावताच मैदानावरील प्रशिक्षण बंद करण्यात आले होते; परंतु ऑनलाइन पद्धतीने त्यांचा अभ्यास घेणे सुरूच राहिले. वर्षभराच्या कालावधीत आंतरवर्ग प्रशिक्षण पूर्ण होऊन त्याच्याशी संबंधित परीक्षाही झाल्या आहेत.