News Flash

तामिळनाडू येथून नाशिकचे १९ विद्यार्थी घरी परतले

टाळेबंदी लागु होताच महाविद्यालय बंद करून विद्यार्थ्यांना घरी जाण्याविषयी सांगण्यात आले

संग्रहित छायाचित्र

नाशिक : टाळेबंदीचा कालावधी वाढत असतांना शिक्षणानिमित्त बाहेरील राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नाशिक जिल्ह्य़ातील १९ विद्यार्थी तामिळनाडूत अडकले. परंतु, लोकप्रतिनिधींच्या मदतीने विद्यार्थी सुखरूप घरी परतले असून त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.

तामिळनाडू येथील तिरपूर, उडमलपेठ येथे महाराष्ट्रातील ३२ विद्यार्थी कुक्कट पालनाचे प्रशिक्षण घेत आहेत. टाळेबंदी लागु होताच महाविद्यालय बंद करून विद्यार्थ्यांना घरी जाण्याविषयी सांगण्यात आले. प्रवासी वाहतूक सेवा बंद झाल्याने विद्यार्थी महाविद्यालयाच्या

वसतिगृह परिसरातच अडकले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १९ विद्यार्थी, सांगलीतील दोन, नगरमधील चार, औरंगाबादचा एक, पुणे परिसरातील पाच आणि सोलापूर येथील एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. येवला येथील महेश तुपे या विद्यार्थ्यांने याविषयी माहिती दिली. टाळेबंदी लागु होताच वसतिगृह व्यवस्थापनाने जेवणाचे दर वाढवले. जेवण अतिशय दर्जाहीन होते. जेवणाची आबाळ होत असतांना आवश्यक औषधेही उपलब्ध होत नव्हती, असे महेशने सांगितले. याबाबत वसतिगृह व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क केल्यानंतर सॅनिटायझर, मास्क देण्यात आले. बाहेर सर्व बंद असल्यामुळे विकत काहीच घेता येत नव्हते. घरच्यांना याबाबत माहिती दिली. मित्रांनी मिळून लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. उदयनराजे भोसले, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मदतीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात अडकलेल्या ३२ विद्यार्थ्यांना प्रवासासाठी ई-पास मिळाल्यानंतर प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या जिल्ह्य़ात सोडण्यात आले, असे महेशने नमुद केले.  नाशिकमध्ये येताच विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. उदयनराजे भोसले, एकनाथ शिंदे, सुनील काटकर, डॉ. नितीन कुलकर्णी यांच्या अथक प्रयत्नातून तामिळनाडूतून विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहचविण्याची  प्रक्रिया पार पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:11 am

Web Title: 19 students from nashik returned home from tamil nadu zws 70
Next Stories
1 मजुरांच्या वाहतुकीत नियोजनाचा अभाव ; मेधा पाटकर यांची तक्रार
2 निवारागृहे शांत शांत..!
3 चार वाहनांच्या अपघातात १७ स्थलांतरित मजूर जखमी
Just Now!
X