News Flash

प्रेमासाठी छतावरुन उडी, पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दिलीप भुसारे असे या तरुणाचे नाव

छायाचित्र प्रातिनिधिक

नाशिक जिल्ह्यात पोलीस ठाण्याच्या तीन मजली इमारतीच्या छतावरुन उडी मारून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. दिलीप भुसारे असे या तरुणाचे नाव असून प्रेमसंबंधातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथे राहणा-या दिलीप भुसारे (२१) या तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही घरातून पळून गेल्याने २ डिसेंबररोजी मुलीच्या आईवडिलांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुरुवारी दिलीप त्याच्या प्रेयसीसह पोलीस ठाण्यात शरण आला. या दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. मुलीचा जबाब घेण्यासाठी तिला पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावर नेण्यात आले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याचा गैरसमज दिलीपला झाला आणि त्याने थेट इमारतीच्या गच्चीवरुन जाऊन खाली उडी मारली. या घटनेत जखमी झालेल्या दिलीपला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 11:17 pm

Web Title: 21 year old youth attempe suicide over love affair in nashik
Next Stories
1 पांडवलेणीच्या पायथ्याशी उद्यान फुलले!
2 त्र्यंबकमधील ‘प्राप्तीकर’च्या कारवाईचा तपशील गुलदस्त्यात
3 छबु नागरेची एकाच बँकेत नऊ खाती
Just Now!
X