राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल बुधवारी  जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी ११ प्रवेशाच्या तयारीस लागले आहेत. जिल्ह्य़ात ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्य शाखेच्या २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत.

शिक्षण विभागाकडून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांकडून नोंदणी करण्यात येत आहे. एक ऑगस्टनंतर पहिला भाग भरून घेण्यात येईल. मागील वर्षी जिल्ह्य़ात सहा हजार, ३३२ जागा प्रवेशाशिवाय रिक्त राहिल्या होत्या. यंदा हे प्रमाण करोनामुळे कमी असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्य़ात कला (४९१०), वाणिज्य (८६००), विज्ञान (१०,१६०) आणि किमान कौशल्य (१३६०) जागा उपलब्ध आहेत. अनुदानितमध्ये कला (३३९०), वाणिज्य (३४८०), विज्ञान (३३२०), किमान कौशल्य (१३६०) अशा ११ हजार, ५५० जागा उपलब्ध आहेत. विनाअनुदानितसाठी कला (१०००), वाणिज्य (३४८०), विज्ञान (३६८०) अशा ८,१६० जागा उपलब्ध आहेत. स्वयंअर्थ सहाय्य अंतर्गत कला (५२०), वाणिज्य (१६४०), विज्ञान (३१६०) अशा पाच हजार ३२० जागा उपलब्ध आहेत. यंदा करोनामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे इयत्ता ११ वी प्रवेशातील रिक्त जागांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

विभागात एक लाख, ४१ हजार २४० जागा उपलब्ध

यामध्ये नाशिक जिल्ह्य़ात कला (२६६४०), धुळे (१३८००), जळगाव (२३५६०), नंदुरबार (८०४०) अशा ७२, ०४० जागा. विज्ञान शाखेत नाशिक (१७,०८०), धुळे (१०,४००), जळगांव (१६,२००) आणि नंदुरबार (७०८०) अशा ५० हजार ७६० जागा. वाणिज्य विभागात नाशिक (६६००), धुळे (११२०), जळगांव (४६८०) आणि नंदुरबार (८००) अशा १३ हजार २०० जागा. किमान कौशल्यसाठी नाशिक(१४८०), धुळे (११२०), जळगांव (२२४०) आणि नंदुरबार (४००) अशा पाच हजार २४० जागा