News Flash

के. के. वाघ गणेशोत्सवात ४३१ विद्यार्थ्यांचे रक्तदान

गणेश उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पंचवटीतील के. के. वाघ शिक्षण संस्था, स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या वतीने आयोजित ‘के. के. वाघ गणेश उत्सव २०१६’अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात ४३१ विद्यार्थ्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली.

रुग्णांना रक्ताची अडचण भासू नये यासाठी गणेश उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकीच्या आवारात डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, तर सरस्वतीनगर आवारात डॉ. प्राची पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  या वेळी मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे आपण देशाची एक प्रकारे सेवा करत असल्याचे नमूद केले. रक्तदानामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आपले रक्त एखाद्या गरजूचे प्राण वाचवू शकते. दर सहा महिन्यांनी रक्तदान करता येते. त्यामुळे आरोग्यही उत्तम राहते, अशी माहिती त्यांनी दिली.

शिबीर उद्घाटनप्रसंगी ‘स्माइल’चे सचिव अजिंक्य वाघ, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, प्राचार्य व्ही. आर. खपली आदी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या आवारातील शिबिरात २३१ आणि सरस्वतीनगरच्या शिबिरात २०० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:45 am

Web Title: 431 students blood donated at nashik in ganesh chaturthi
Next Stories
1 गणेश मंडळांसाठी फुकट ते पौष्टीक
2 पॉवरग्रिडविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
3 चारसदस्यीय प्रभाग निश्चित
Just Now!
X