19 October 2020

News Flash

मालेगाव पाणी वितरणासाठी ४९ कोटी मंजूर

या प्रस्तावास एप्रिलअखेपर्यंत प्रशासकीय मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले.

snake came through water tab in Kalyan : कल्याण-डोंबिवलीकरांना स्वच्छ पाणी पुरविले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी शहराच्या अनेक भागांमध्ये चिखल, दुर्गंधीयुक्त पाणी येण्याच्या तक्रारी नेहमीच्याच झाल्या आहेत.

शहर व हद्दवाढीतील गावांमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसाठी अतिरिक्त पाणी वितरण जलवाहिनी, पाणी घेण्याची यंत्रणा बदलणे आदी प्रस्तांवाना अमृत अभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी ४९.७५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

महानगर पालिकेमार्फत जलशुद्धीकरण केंद्रापासून सोयगांव, द्याने, भायगांव, म्हाळदे येथील नवीन बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत गुरूत्व पध्दतीने जोडणारी एकूण २७ किलोमीटरची जलवाहिनी, २७७.५४ किलोमीटरची अतिरिक्त वितरण जलवाहिनी, जुने जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा बदलणे, म्हाळदे शिवारातील इंदिरा आवास योजनेच्या लोकवस्तीसाठी ६.५० लक्ष लिटरचे जलकुंभ बांधणे यासाठी अमृत अभियान योजने अंतर्गत मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी दादा भुसे यांच्यासह मनपा गटनेते मनोहर बच्छाव, नगरसेवक तानाजी बच्छाव, मजूर फेडरेशनचे संचालक नीलेश आहेर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाचे आयुक्त किशोर बोर्डे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत अमृत अभियान योजनेअंतर्गत जलवितरण व्यवस्थेस मंजुरी देऊन पहिल्या टप्प्यासाठी ४९.७५ कोटीचा निधी मंजूर केला. मालेगाव शहरासह हद्दवाढीतील क्षेत्रात नवीन जलवितरण व्यवस्था झाल्याने परिसरात नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात शहरातील आवश्यक ठिकाणांच्या जुन्या जल वितरण व्यवस्थेची एकूण २४३ किलोमीटरची जीर्ण जलवाहिनी बदलण्यासाठी २८.५७ कोटी रुपयाचा प्रस्ताव मनपा मालेगावमार्फत सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावास एप्रिलअखेपर्यंत प्रशासकीय मंजुरी व निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:47 am

Web Title: 49 crore sanctioned for water in malegaon
Next Stories
1 संख्येनुसार मूल्यमापन समित्यांची स्थापना
2 यशवंत व्यायामशाळेला एक कोटीचा निधी देण्याची आमदारांची ग्वाही
3 विद्यापीठांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास आवश्यक
Just Now!
X