X

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात, १२ ते १५ प्रवासी गंभीर जखमी

जखमींवर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत

नाशिकमधील मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात झाला आहे. प्रवासी गाडी आणि आयशरची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १२ ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चांदवड तालुक्यातील आडगावजवळ हा अपघात झाला आहे. जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.