News Flash

आदर्श गाव संकल्प योजना सर्वागीण विकासासाठी प्रेरक

मालेगाव तालुक्यातील खडकी येथे विशेष ग्रामसभा आणि गावफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुसे बोलत होते.

आदर्श गाव संकल्प योजना सर्वागीण विकासासाठी प्रेरक

दादा भुसे यांचा विश्वास

नाशिक- राज्य शासनामार्फत आदर्श गाव संकल्पना आणि प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून दर वर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते. सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडण्याची जिद्द प्रत्येक गावकऱ्यांने उराशी बाळगण्याचे आवाहन करतांनाच गावाच्या सर्वागिण विकासासाठी आदर्शगाव संकल्प योजना प्रेरक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. मालेगाव तालुक्यातील खडकी येथे विशेष ग्रामसभा आणि गावफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुसे बोलत होते. आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव

पवार, सरपंच आशा देवरे, उपसरपंच ज्योती देवरे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भिकन शेळके, अभय पाठक, कृषी उपसंचालक सुरेश भालेराव, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदी उपस्थित होते.

खडकी गावाचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर गावे देखील त्याचे अनुकरण करतील. वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग या गावात असल्यामुळे नशा मुक्तीसाठी पोषक वातावरण मिळणार आहे. खडकी गावात

लोकसहभागातून यापूर्वीच अभ्यासिका आणि व्यायामशाळा साकारण्यात आली आहे. गाव विकासासाठी अध्यात्माची जोड देण्यासोबतच भावी पिढीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध होणाऱ्या सोयीसुविधांवरही भर देण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यातही या गावाचा चांगला सहभाग आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन गावाचा नक्कीच विकास होईल, असे भुसे यांनी सांगितले.

दरम्यान, कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची सांगड घालून गावाचा सर्वागीण विकास साधता येईल, असे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. खडकी या गावाच्या विकासासोबतच गाव पाणीदार करण्यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ग्रामकार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. पवार यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना काही प्रश्न विचारुन त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच गावाचा सर्वागिण विकास शक्य असल्याची भावना व्यक्त करतांना गावात वनव्यवस्थापन, जलव्यवस्थापनासोबत समाज व्यवस्थापन किती गरजेचे आहे याबाबत सखोल माहिती पवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 1:40 am

Web Title: adarshgaon sankalp yojana inspiration overall development dada bhuse ssh 93
Next Stories
1 देवराई, वनराई प्रकल्पांसाठी अर्थबळ हवे
2 भुजबळ-सेना आमदारात खडाजंगी
3 महापालिकेचे भूखंड बांधकाम व्यावसायिकांपासून सुरक्षित ठेवणार
Just Now!
X