|| चारुशीला कुलकर्णी

सियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख..

panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
ग्रामविकासाची कहाणी
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभूमीवर तैनात भारतीय जवानांसाठी नाशिकमधील १९ वर्षीय अजिंक्य जाधव या युवकाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मार्गदर्शनाखाली खास पोशाख तयार केला आहे. तो थंडी आणि शत्रू या दोघांपासून बचाव करणारा आहे.

या विशेष पोशाखाला संरक्षण मंत्रालयाने अनुकूलता दर्शविली आहे. हा पोशाख वजनाने कमी आहे. शिवाय गोळीबारात जखमी जवानावर ‘उपचार’ करणाराही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सभोवतालच्या वातावरणानुसार त्याचा रंग बदलतो. त्यामुळे जवानाचा थांगपत्ता शत्रूला लवकर लागणार नाही, अशी त्याची रचना आहे. पोशाखाच्या रचनेसंदर्भात पेटंट अर्ज त्याने सादर केला आहे.

देशाच्या सीमांवर तैनात जवानांबद्दल अजिंक्यच्या मनात लहानपणापासून आत्मीयता होती.  एखादा पोशाख जवानाचा बचाव कसा करू शकतो, याचा विचार करून शालेय प्रदर्शनासाठी त्याने एक ‘जॅकेट’ तयार केले. कालांतराने त्यात त्याला आणखीही काही सुधारणा सुचल्या. मात्र आर्थिक आधार भक्कम नसल्याने त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पत्र पाठविले. सहा महिन्यांनंतर दहशतवादविरोधी पथकातील काही अधिकाऱ्यांनी त्याला भेटायला बोलावून त्याचा प्रकल्प समजून घेतला. या संदर्भात काही सूचना केल्या. हा विषय तेथेच थांबला.

मध्यंतरी गुवाहाटी येथील आयआयटीमध्ये प्रकल्प सादरीकरणासाठी त्याला निमंत्रित करण्यात आले होते. तिथे सेनादलांचेही शिबीर होते. त्यात सहभागी कर्नल संतोष रस्तोगी यांनी त्याचा प्रकल्प समजावून घेत त्याला सियाचीनमधील सैनिकांसाठी काय करता येईल, असा प्रश्न विचारला. सियाचीनची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक संकटांची शक्यता, सैनिकांना येणाऱ्या अडचणी, शत्रूकडून गोळीबाराचा असणारा धोका आदींची कल्पना दिली. अजिंक्यने या  प्रकल्पावर काम सुरू केले. अजिंक्यला तिथे प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यायची होती; पण दरम्यानच्या काळात त्याला अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. या काळात त्याचे सियाचीनमधील सैनिकांच्या पोशाखावर काम सुरूच होते. सियाचीन भागात कमालीचे घसरणारे तापमान, हिमवादळे यामुळे जवानांना भेडसावणाऱ्या अडचणी, या सर्वाचा अभ्यास करून पोशाखाची रचना करण्यात आली. ही रचना  प्रभावी होण्यासाठी ‘इस्रो’ने त्याला मार्गदर्शन केले.  सध्या सियाचीनमधील सैनिकांचा पोशाख श्रीलंका येथील कंपनी तयार करते. मात्र अजिंक्यच्या या देशी पोशाखाला संरक्षण मंत्रालयाने अनुकूलता दर्शविल्याचे समजते.

पोशाखाची वैशिष्टय़े

  • सियाचीनसारख्या थंड प्रदेशात कार्यरत जवानांची निकड लक्षात घेऊन पोशाखाची रचना.
  • त्यात ‘आपोआप औषधोपचारा’ची व्यवस्था आहे. म्हणजे सैनिकाला गोळी लागताच जॅकेटवर त्या ठिकाणी ‘ब्लास्ट’ होत त्या नेमक्या भागावर आवश्यक वेदनाशामक गोळी किंवा औषध पसरेल.
  • सियाचीनची बर्फवृष्टी लक्षात घेऊन पोशाखात चार थर. त्यामुळे सैनिकांचे थंडीपासून रक्षण.
  • ‘सिलिका जेल’च्या वापरामुळे पोशाखाचे वजन अतिशय हलके.
  • हा पोशाख सभोवतालच्या वातावरणानुसार रंग बदलत असल्याने दूरवरून जवान सहज हुडकता येणे कठीण.