हरसूल तालुक्यातील रमेश भीमा वळी या आदिवासी तरुण चित्रकाराच्या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन ‘जलरंग’ या नावाने १० ते १२ जून या कालावधीत कुसुमाग्रज स्मारकातील कला दालनात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध चित्रकार तथा रमेश वळीचे गुरू प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड, लेखक दत्ता पाटील उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. आदिवासी पाडय़ात जन्मलेल्या रमेशला निसर्ग अधिक जवळचा. भाषेसोबत तो निसर्गाची अनोखी चित्रभाषाही शिकला. भिंतीवरील वारली चित्रात भर टाकू लागला. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले गुण मिळवून तो धुळ्याच्या शासकीय विद्या निकेतनमध्ये गेला. बहरलेल्या चित्रभाषेला आकार दिला तो नाशिकच्या महाविद्यालयाने. आज हा आदिवासी तरुण नव्या पिढीचा चित्रकार बनला आहे. रंगरेषांमधून उमटणाऱ्या सौंदर्याला वेदनेची किनार रमेशच्या चित्रांमध्ये पाहावयास मिळते. या प्रदर्शनात काही चित्रे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून २० टक्के रक्कम ही आदिवासी भागात टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याची उपाययोजना करण्यासाठी देण्याचा निर्णय वळीने घेतला आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, ही निसर्गचित्रे नाशिककरांना सुखावतील.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी