News Flash

कलावंत घडविणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा

लेखन, अभिनय, संगीत , नेपथ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी  लोकांकिकाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

 

स्पर्धेच्या गुणवत्तेवर प्राचार्याची मोहर

महाविद्यालयीन विश्वात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ने स्वतंत्र ठसा उमटविला आहे. स्पर्धेत हार-जीत होतच असते. एकांकिका ही ठरावीक वर्गाची मक्तेदारी नसून रंगमंच सर्वासाठी खुला आहे. यातून तुम्हाला शिकायला मिळेल, असा विश्वास ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा देते. यातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहसा नाटय़कलेसाठी पोषक वातावरण मिळत नाही. लोकांकिकामुळे आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. लेखन, अभिनय, संगीत , नेपथ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी  लोकांकिकाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची ठेव आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला आहेत. त्यांना योग्य वाव मिळणे अपेक्षित असते. ती संधी ‘लोकसत्ता लोकांकिका’ने दिली आहे. यामुळे नक्कीच उच्च दर्जाचे ग्रामीण कलाकार महाराष्ट्राला मिळतील, ही आशा आहे.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत. – प्राचार्य डी. एफ. शिरोडे (म.स.गा. महाविद्यालय, मालेगाव) कलावंत घडतो, असा सूर स्पर्धेत सहभागी संघांच्या प्राचार्यानी व्यक्त केला आहे.

नवीन शिकावयास मिळते हे महत्त्वाचे

महाविद्यालयाच्या नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी मनापासून मेहनत घेतली. प्राथमिक फेरीत निवड झाल्याने त्यांच्या कष्टाला फळ मिळाले आहे. महाविद्यालयाकडून प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अनुभवी प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. तसेच नाटकाच्या तालमीसाठी जागा, इतर पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला प्रतिष्ठित वलय असल्याने या स्पर्धेत यश मिळविण्याची महाविद्यालयीन विश्वात चुरस आहे. लोकांकिकाच्या प्राथमिक फेरीत निरनिराळ्या भागांतून अनेक महाविद्यालये सामील होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. या स्पर्धेतून व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळत असल्याने विभागीय फेरीत निवड होण्याच्या उद्देशाने विद्यार्थी जोरदार तयारी करत आहेत. – प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड (के.टी.एच.म. महाविद्यालय, नाशिक)

यंदाही यशाची परंपरा कायम

दर वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी अपेक्षित असे उत्तम सादरीकरण करून महाविद्यालयाची यशाची परंपरा राखली. सलग तीन वर्षांपासून आमच्या महाविद्यालयाची एकांकिका अंतिम फेरीत जात आहे. या वर्षी विद्यार्थ्यांनी अंतिम फेरी जिंकण्याची जिद्द बाळगली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा संपूर्ण पाठिंबा आहे. तसेच माजी अनुभवी विद्यार्थी संघाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. लोकांकिकातून अनेक हौशी विद्यार्थी तयार होतात. ही स्पर्धा नाटकाबद्दल प्रेम वाढविते. विद्यार्थी सप्टेंबर महिन्यापासूनच लोकांकिकाचे नियोजन करतात. स्पर्धेमुळे विद्यार्थी लिहिते झाले. काही जण नाटकाच्या वेगवेगळ्या तंत्राचा अभ्यास करून नाटय़ क्षेत्राचा करिअर म्हणून निवड करत आहेत. – प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी (हं.प्रा.ठा. कला महाविद्यालय, नाशिक)

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत

‘लोकसत्ता लोकांकिका’मुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. एकांकिकेची मांडणी, संहिता, दिग्दर्शन या सर्व बाजू आमच्या विद्यार्थ्यांनीच हाताळल्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला. आमच्या महाविद्यालयाची जरी प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवड झाली नसली तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या संघातील उणिवा लक्षात आल्या. परीक्षकांच्या सूचनेनुसार त्यात सुधारणा करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न राहील. मुख्य म्हणजे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना योग्य दिशा मिळाली. – प्राचार्य यू. वाय. कुलकर्णी (भोसला कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक)

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना लोकांकिकामुळे वाव

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आमचे महाविद्यालय दर वर्षी सहभागी होते. या वर्षी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवडणुकांचा विषय घेऊन सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एकांकिका सादर केली. सर्व विद्यार्थी कलाकार म्हणून नवखे असूनही उत्तम संघटनकौशल्यामुळे महाविद्यालय प्राथमिक फेरीत यश मिळवू शकले. ‘लोकसत्ता लोकांकिका’द्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. याआधी लोकांकिकात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी सिनेक्षेत्रात आज नाव कमावत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत महाविद्यालयीन विद्यार्थी लोकांकिकाची आवर्जून वाट बघतात.

– प्राचार्य अस्मिता वैद्य (न. ब. ठाकूर विधि महाविद्यालय, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:08 am

Web Title: artists lokasatta lokanika competition akp 94
Next Stories
1 कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा
2 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे आंदोलन
3 दालन फोडून ७५ लाखांचे आयफोन लंपास
Just Now!
X