24 September 2020

News Flash

भाजीबाजार उठविणाऱ्या महापालिके च्या पथकावर हल्ला

आडगांव परिसरातील कोणार्कनगर आणि श्रीराम नगर परिसरातील मोकळ्या जागेत भाजीबाजार भरतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : शहराच्या नववसाहतींमध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे भाजीबाजार भरत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून होणाऱ्या तक्रोरीची दखल घेत आडगाव परिसरातील कोणार्कनगर, श्रीरामनगरात भाजीबाजार उठविण्यासाठी गेलेल्या महापालिके च्या अतिक्र मण निर्मूलन पथकावरच व्यापारी, विक्रेते आणि शेतकऱ्यांनी वाद घालत हल्ला केला. आडगाव पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगांव परिसरातील कोणार्कनगर आणि श्रीराम नगर परिसरातील मोकळ्या जागेत भाजीबाजार भरतो. या ठिकाणी २०० पेक्षा अधिक व्यापारी, शेतकरी, विक्रेते हे जमा होतात. विक्रीनंतर न खपलेला माल तेथेच रस्त्याच्या कडेला टाकू न देण्यात येतो. ही मंडळी त्याच ठिकाणी थुंकतात, परिसरात अस्वच्छता निर्माण करतात. याविरोधात स्थानिकांकडून महापालिके च्या पंचवटी विभागीय कार्यालयात वारंवार लेखी स्वरूपात तक्रोरी दाखल करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू होण्यापूर्वी निलगिरी बाग येथे भाजीबाजारासाठी ओटा धर्तीवर जागा उपलब्ध करून देण्यात आली; परंतु त्या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा स्थानिक, व्यापारी आणि शेतकरी यांच्यात वाद होत असतात. सोमवारी सायंकाळी पंचवटी विभागीय अधिकारी  विवेक धांडे हे पथकासह त्या ठिकाणी गेले असता स्थानिकांनी त्यांच्या सोबत वाद घातला. त्यांना घेराव घालत महापालिके च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित के ले.

या सर्व प्रकारानंतर मंगळवारी सकाळी या परिसरात महापालिके च्या वतीने अतिक्र मण निर्मूलन मोहीम राबविण्याचे ठरले. मंगळवारी सकाळी ८ वाजता महापालिके चे पथक, पोलीस कर्मचारी बाजार परिसरात आले. अतिक्र मण निर्मूलन मोहीम सुरू असताना व्यापारी, शेतकऱ्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात के ली. काहींनी कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात उचलत शर्ट फाडला, एकाने दगड मारून फे कले. त्यामुळे मोहीम सुरू असताना तणाव निर्माण झाला. पथकातील वाहनात चढून जमा के लेला माल परत विक्र ेते रस्त्यावर नेत होते. या गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न के ला; परंतु जमावाने पथकावर हल्ला के ल्याने हे प्रकरण चिघळले. आडगाव पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:02 am

Web Title: attack on municipal squad by illegal vegetable vendor in nashik zws 70
Next Stories
1 कांदा निर्यातबंदीच्या फेरविचाराचे संकेत
2 महापालिके च्या विद्यार्थ्यांचा विदेशातील शिक्षिके शी ऑनलाइन संवाद
3 प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा
Just Now!
X