आजारपणाला कंटाळलेल्या ६५ वर्षांच्या वृद्धाने ६० वर्षांच्या पत्नीवर चाकूने हल्ला करून स्वत:वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे हा प्रकार घडला. दोघांना मालेगाव येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जायखेडा पोलिसांनी दगा तानाजी हगवणे (६५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते दोन महिन्यांपासून आजारी आहेत. आजारपणास कंटाळल्यामुळे काही दिवसांपासून कुटुंबीयांवर चिडत होते. दुपारी पत्नी सुनंदाबाई यांच्यावर दगा यांनी चाकूचे वार केले. त्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्या गंभीर जखमी झाल्या.
दगा यांनी त्यानंतर स्वत:वरही चाकूने वार केले. हा सर्व प्रकार कुटुंबीयांना समजल्यावर त्यांना तत्काळ ताहाराबाद येथील प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी दगा यांचा मुलगा नंदकिशोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जायखेडा पोलिसांनी दगा हगवणेविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 3:26 am