गुन्हेगार सुधार योजना उपक्र मात सराईत गुन्हेगारांचे मनोगत

नाशिक : पोलीस आयुक्तालयातर्फे गुन्हेगारांनाही माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी यासाठी गुन्हेगार सुधार योजना हा अनोखा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. मंगळवारी या उपक्र माला सुरुवात झाली. या वेळी सराईत गुन्हेगारांसह अन्य गुन्हेगारांना आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन के ले. गुन्हेगारांनीही मनोगतात वाईट संगत, व्यसन हेच प्रामुख्याने गुन्हेगारी करण्यास कारणीभूत ठरतात, असे सांगितले.

शहर पोलिसांनी सराईतांसह अन्य गुन्हेगारांना प्रवाहात आणणे आणि वर्षभरात त्यांना सुधारण्याची संधी देण्याचे ठरविले आहे. सुधारणा झाल्यास त्यांच्यावर असलेले गुन्हे काढून टाकण्यात येतील. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येतील. शहर पोलीस आयुक्त हद्दीतील वेगवेगळ्या ठाण्यांत गुन्हेगार सुधार योजना उपक्र म सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी अंबड तसेच नाशिकरोड येथे हा मेळावा झाला. अंबड पोलीस ठाण्यात नोंदीवरील ७० हून अधिक गुन्हेगारांनी हजेरी लावली. नाशिकरोड येथे उपनगर, नाशिकरोड तसेच देवळाली कॅ म्प परिसरातील गुन्हेगारांनी हजेरी लावली.

मेळाव्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना सुधारण्याची संधी दिली जात आहे. गुन्हेगाराचा शिक्का पुसण्यासाठी या गुन्हेगारांनी दर महिन्याला जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावत कु ठल्याच गुन्ह्य़ात आपला सहभाग नसल्याचे सांगायचे आहे. या अनुषंगाने संबंधितांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले. संबंधित वर्षभरात कु ठल्याच गुन्ह्य़ात सहभागी नसतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस एक पाऊल पुढे टाकतील, असे पोलीस  आयुक्त पांडेय यांनी सांगितले.

वाईट संगत, व्यसन हेच प्रामुख्याने गुन्हेगारी करण्यास कारणीभूत ठरतात, असे मत काही सराईत गुन्हेगारांनी व्यक्त केले. गुन्हेगार विशाल सांगळे याने शहरात सुरू असलेली अमली पदार्थाची विक्री बंद करण्याची मागणी केली. चौकशीच्या नावाखाली पोलीस सातत्याने ठाण्यात बोलावून छळ करतात. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पैसे मागितले होते. वाईट संगतीच्या मित्रांमध्ये राहिलो. गुन्ह्य़ात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी गुन्हेगार हा शिक्का बसला. त्यामुळे नोकरी करताना अडचणी येतात, असे सांगितले.

नळकाम, बांधकाम मिळेल ते काम करूनही पोटापुरते पैसे मिळविण्यात अडचणी येत असल्याची व्यथा काहींनी मांडली.  मेळाव्यात उद्योजक विकास केंद्रातर्फे शासनाच्या विविध योजना आणि औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी साहाय्यक आयुक्त सोहेल शेख, गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त नवनाथ तांबे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी तसेच सातपूरचे किशोर मोरे, इंदिरानगरचे नीलेश माईनकर, गुन्हे शाखा युनिट दोनचे अजय शिंदे तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे, डॉ. हेमंत सोननीस यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.