News Flash

रितिकाला तिहेरी मुकुट

नाशिकची वैदेही चौधरी १९ वर्षांखालील गटात विजेती

नाशिकची वैदेही चौधरी १९ वर्षांखालील गटात विजेती

नागपूरच्या रितिका ठाकरने १७ वर्षांआतील गटात एकेरी, दुहेरी तर १९ वर्षांआतील गटात दुहेरीचे विजेतेपद मिळवित येथे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला. यजमान नाशिकच्या वैदेही चौधरीने १९ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले.

१७ वर्षांखालील गटात रितिकाने पुण्याच्या पूर्वा बर्वेला २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. दुहेरीत रितिकाने सिमरन सिंघीच्या साथीने आर्या शेट्टी-जान्हवी जगताप या जोडीवर मात करून विजेतेपद पटकावले. या गटात मुलांमध्ये ठाण्याच्या अमन संजयने मुंबईच्या अ‍ॅक्शन शेट्टीचे आव्हान २१-१८, २१-११ असे परतवून लावत विजेतेपदावर मोहोर उमटवली. दुहेरीत मात्र शेट्टीने नाशिकच्या अजिंक्य पाथरकरच्या साथीने नागपूरच्या गौरव मिथे-रोहन गर्बानी जोडीवर २१-१९, १५-२१, २१-१४ अशी मात केली.

१९ वर्षांखालील गटात दुहेरीत रितिका ठाकर-सिमरन सिंघी जोडीने नाशिकच्या अदिती कुटे-विशाखा पवार जोडीवर २१-१२, २१-१७ अशी मात केली. मुलांच्या दुहेरीत अनिरुद्ध मयेकर-करण जाधव जोडीने पुण्याच्या देवाशिष नावडीकर-हर्ष जगधने जोडीचा २०-२२, २१-१५, २१-१३ असा फडशा पडला.

१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत धमाकेदार विजय मिळवणाऱ्या अमन संजय यास १९ वर्षांखालील अंतिम फेरीत दुखापत झाल्याने पुण्याच्या आर्य भिवपत्कीला विजयी घोषित करण्यात आले. सामना सोडला तेव्हा अमन पहिल्या सेटमध्ये ३-०  अशा आघाडीवर होता. माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू उदय पवार, प्रज्ञा गद्रे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 3:16 am

Web Title: badminton competition in nashik
Next Stories
1 वृक्ष लागवडीत कुचराई करणारे तीन ठेकेदार काळ्या यादीत
2 चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह एकावर गोळीबार
3 ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे शाळाबा मुलांचा शोध
Just Now!
X