सिन्नर, इगतपुरी, दिंडोरीतील प्रकार
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील काही भागांत १२ ते १५ कावळे मृत झालेले आढळून आल्यानंतर आता सिन्नर तालुक्यातील दातली बंधाऱ्यात १० बदक, पाणकोंबडय़ा, इगतपुरीमध्ये भारद्वाज, चिमणी आणि दिंडोरी तालुक्यात कावळा मृतावस्थेत सापडले. यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून या सर्व पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सुरगाणा तालुक्यातील कावळ्याचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले गेले. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला किंवा अन्य कारणाने त्याची स्पष्टता होणार आहे.
देशासह राज्यातील काही भागांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. याच काळात सुरगाणा तालुक्यातील उंबरदे परिसरात १२ ते १५ कावळे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. सुरगाण्यापाठोपाठ इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी तालुक्यात अन्य पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. सुरगाण्यातील मृत कावळ्यांचे नमुने आधीच प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यात दातली येथे बंधारा आहे. त्या ठिकाणी १० बदक आणि पाणकोंबडय़ा मृतावस्थेत आढळून आल्या. इगतपुरी तालुक्यात चिमणी, भारद्वाज पक्षी मृतावस्थेत आढळले. दिंडोरी तालुक्यात एका कावळ्याचा मृत्यू झाला. या सर्व पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे डॉ. गर्जे म्हणाले.
विविध पक्ष्यांच्या मृत्यूमुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता आहे. कुक्कुटपालन केंद्रात नियमित साफसफाई, र्निजतुकीकरण, विलगीकरणाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.
महापालिके चे आवाहन
शहर, परिसरातील कु क्कु टपालन व्यावसायिकांनी कें द्रातील पक्ष्यांमध्ये मरगळ आढळल्यास महापालिके च्या पशुसंवर्धन विभागाशी ०२५३ – २३१७२९२ या क्र मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कै लास जाधव यांनी के ले आहे. बर्ड फ्लू आजाराला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पक्ष्यांना ज्या भांडय़ातून रोज खाद्य दिले जाते, अशी भांडी नियमित स्वच्छ करावीत. कुक्कु टपालन कें द्रात कार्यरत व्यक्तींनी वारंवार हातांची स्वच्छता करावी. चिकन, अंडे हाताळताना हातमोज्यांचा वापर करावा. नागरिकांनी खाण्यात पूर्णत: शिजविलेल्या चिकन, अंडय़ाचा वापर करावा असे जाधव म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 1:09 am