आज मानवी साखळी

नाशिक : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष तसेच महापालिके च्या वतीने पाच जून रोजी नंदिनी नदी पुनरुज्जीवन आणि संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता उपक्र मास सुरुवात होणार असून आरोग्य मानवी साखळी आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

नंदिनी नदीला प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नंदिनीने मोकळा श्वास घ्यावा, नदीला गतवैभव प्राप्त करून नाशिककरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे, यासाठी भाजपच्या पर्यावरण मंचने स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी मोहीम हातात घेतली आहे. शनिवारी नंदिनी नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी  येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरण प्रेमीची आरोग्य साखळी धरण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी यांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पर्यावरण मंच संयोजक उदय थोरात यांनी के ले आहे.

सद्यस्थितीत नदी पात्रात कचरा मोठय़ा प्रमाणात जमा होतो. या अनुषंगाने नदी पात्राची स्वच्छता तसेच नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीचे निरीक्षण करत त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून दोन्ही तीरांवर घाट बांधण्यात येणार आहे. या अनुषंगाने वृक्ष लागवड, नदीपात्रातील अतिक्र मण काढण्यात येणार आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर, शनिवारी नंदिनी नदीचे उगमस्थान अंजनेरी पासून तर नंदिनी नदीच्या गोदावरीस मिळणाऱ्या संगम स्थानापर्यंत एकूण १० विभागामध्ये पर्यावरण मंचतर्फे नदीपात्र व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखली जावी, वृक्षारोपण करण्यात यावे, यासाठी  व्यापक प्रमाणात जनजागरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.  या १० टप्प्यातील १० व्या टप्प्यात टाकळी येथे विधिवत आरती आणि पूजा होणार आहे. टाकळी ते पुणेरोड नंदिनी नदी पूल परिसरात उत्तर बाजूने नगरसेविका अर्चना थोरात, सुमन भालेराव  तर दक्षिण बाजूने भास्करराव घोडेकर, नगरसेवक अनिल ताजनपुरे, कुणाल  वाघ, नवव्या टप्प्यात मुंबई नाका परिसरात उत्तर बाजूस नगरसेवक प्रथमेश गीते, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव तर दक्षिण बाजूस  द्वारका मंडळ अध्यक्ष सुनील देसाई, महापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका सुप्रिया खोडे, शाहीन मिर्झा आदी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. वेगवेगळ्या टप्प्यात तेथील लोकप्रतिनिधी त्यात सहभागी होतील, अशी माहिती प्रकल्प संयोजक लक्ष्मण सावजी यांनी दिली आहे.