नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा

कधी पर्यावरणप्रेमींचा विरोध.. कधी दुष्काळसदृश परिस्थिती, तर कधी राजकीय श्रेयवादाची लढाई, यासह इतर विविध कारणांमुळे गंगापूर धरण परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा ‘बोटिंग क्लब’ अद्यापही सर्वासाठी खुला न झाल्याने अखेर हा बोट क्लब खुला होणार तरी केव्हा, असा प्रश्न नाशिककर विचारू लागले आहेत.

nashik, one man Arrested, Smuggling Liquor, Worth 66 Lakh, from Goa, smuggling Liquor from Goa, nashik Smuggling Liquor, nashik news, crime news,
मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…

तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहराला सुंदर करण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने गंगापूर धरण परिसरात बोटिंग क्लब हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास आणला. प्रकल्प पूर्ण झालेला नसतांना त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी त्याचे उद्घाटनही उरकण्यात आले. पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप हा प्रकल्प सर्वासाठी खुला करण्यात आलेला नाही.

प्रारंभी प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी बोटींमुळे पाणी प्रदूषित होण्याचा मुद्दा मांडत विरोध केल्याने त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या बोटी या जर्मन तसेच अमेरिकन बनावटीच्या आहेत. त्या ठिकाणी पर्यावरण निकषाचे पालन करतच बोटी तयार होत असल्याने गंगापूर धरण परिसरात प्रदूषण होण्याचा प्रश्नच नव्हता. पर्यावरणप्रेमींचा विरोध मावळत असतांना जिल्हा परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बोटी पाण्यात उतरल्याच नाहीत. राजकीय श्रेयवादात बोटिंगचा दर्जा आणि काही मुद्यांवर प्रश्न उपस्थित झाल्याने क्लबच्या इमारतीलगत बोटी प्लास्टिक आच्छादनात बांधून ठेवण्यात आल्या.  या सर्व कालावधीत महामंडळाचा देखभाल तसेच सुरक्षिततेच्या मुद्यावर वर्षांकाठी चार ते पाच लाख रुपये खर्च होत आहे.

हा खर्च भरून निघावा म्हणून बोटींग क्लबची इमारत मागील वर्षी साखरपुडा, लग्न, डोहाळेजेवण अशा मंगल कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र वर्षभरात या ठिकाणी ‘आमरस’ चा सामूहिक भोजनाचा कार्यक्रम वगळता एकही कार्यक्रम झालेला नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर महामंडळाने तिसऱ्यांदा निविदा काढत हा प्रकल्प चालविण्यास कोणीतरी पुढे यावे यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

बोट क्लब संपूर्णपणे ‘पर्यटन हब’ व्हावे यासाठी धरण परिसरात ग्रेप पार्क हे २८ खोल्यांचे तारांकित हॉटेल बांधण्यात येणार असून बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल. लहान मुलांसाठी अ‍ॅडव्हेंचर क्लब तयार करण्यात येणार आहे. वास्तविक अद्याप पाटबंधारे विभागाने क्लबची इमारत पूर्ण झाल्याचा दाखला दिलेला नाही. त्यामुळे तेथील काही कामे आजही रेंगाळली आहेत. यामुळे बोटी अजून धरणात उतरल्या नाहीत. अशा स्थितीत ग्रेप पार्क किंवा अ‍ॅडव्हेंचर क्लब तयार करण्याची धडपड का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. बोट क्लब लवकरात लवकर नाशिकककरांसाठी खुला करण्याची गरज अधिक आहे.

क्लबच्या पाच बोटी तापी नदीकाठी

बोटा क्लबच्या ताफ्यात ४७ अत्याधुनिक बोटी आहेत. त्यातील पाच बोटी या सारंगखेडा यात्रेदरम्यान तिकडे नेण्यात आल्या. त्या पाच बोटींचा तापी नदीवर येणारे पर्यटक आनंद लुटत आहेत. नाशिकचे बोट क्लब खुले झाल्यास त्या मूळ ठिकाणी आणण्यात येतील, असे सांगण्यात येते.