News Flash

बॉम्बसदृश वस्तूमुळे पोलिसांची धावपळ

शहरातील शरणपूर रस्त्यावरील कुलकर्णी उद्यानासमोरील उच्चभूंच्या वसाहतीत मंगळवारी बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळल्याने पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

बॉम्बसदृश संशयास्पद वस्तूचे सर्व भाग विलग करण्यात आले. (छाया- यतीश भानू)

फटाक्याची दारू भरलेल्या चेंडूला वात जोडणी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील शरणपूर रस्त्यावरील कुलकर्णी उद्यानासमोरील उच्चभूंच्या वसाहतीत मंगळवारी बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळल्याने पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. तपासणीअंती खोक्यातील प्लास्टिकच्या चेंडूत फटाक्यांची दारू भरलेली

आढळली. यामुळे स्थानिक नागरिकांसह पोलिसांचाही जीव भांडय़ात पडला. यावेळी बघ्यांची नेहमीप्रमाणे गर्दी झाली होती. फटाक्याची दारू भरून वात लावलेला चेंडू इथे कसा पोहचला, याचा शोध यंत्रणा घेत आहे.

कुलकर्णी उद्यानासमोरील ठक्करनगर येथील मनोहर बंगल्याच्या भिंतीजवळ खोक्यात ही संशयास्पद वस्तू आढळली. महापालिकेचे सफाई कर्मचारी रोहित ढिकले आणि राजेंद्र ठोमरे नेहमीप्रमाणे सफाईचे काम करीत होते.  कचरा काही विशिष्ट अंतरावर एकत्र करून नंतर तो उचलला जातो. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढिग उचलताना खोक्यात चेंडूसारखी वस्तू दिसली. त्यातून पावडर बाहेर आली. यामुळे स्फोटकासारखी वस्तू असल्याचा कामगारांचा संशय बळावला. याच वेळी मार्गावरून एका पोलीस अधिकाऱ्याचे वाहन जात होते. कामगारांनी संबंधितांना ती वस्तू दाखविली. त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. अवघ्या काही मिनिटात सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, बॉम्ब शोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी धाव घेतली. जिथे संशयास्पद वस्तू आढळली, तो उच्चभ्रुंची निवासस्थाने, आसपास व्यापारी संकुलांचा परिसर आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करीत परिसर प्रतिबंधित के ला. बॉम्बशोधक पथकाने संशयास्पद खोक्याची तपासणी सुरू केली. त्यात प्लास्टिक चेंडूत फटाक्यांची दारू भरून चेंडूला वात लावलेली असल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती बॉम्बसदृश वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचे धातू अथवा स्फोटक मिश्रित घटक नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

जवळपास तासभर हा घटनाक्रम चालला. यावेळी आसपासच्या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतरांनी मोठी गर्दी केली होती. आसपासच्या इमारतीतील नागरिक आपल्या घरातून हे सर्व पाहत होते.

बॉम्बसदृश दिसणारी वस्तू कुणी इथे आणून ठेवली याची स्पष्टता झालेली नाही. बडय़ा मंडळींच्या बंगल्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. परंतु, बाहेरील भागावर नजर ठेवली जाईल अशी व्यवस्था संबंधितांनी केलेली नसल्याचे यावेळी आढळून आले.

शरणपूर रस्त्यावरील निवासी वसाहतीत बॉम्बसदृश्य वस्तू सापडली. सरकारवाडा पोलिसांसह बॉम्ब शोधक-नाशक (बीडीडीएस) पथकाने तातडीने धाव घेऊन तिची पडताळणी केली. तेव्हां खोक्यातील प्लास्टिकच्या चेंडूत फटाक्यांची दारू भरलेली आढळली, त्याला वात लावलेली होती. या वस्तूचे सर्व भाग विलग करण्यात आले. संशयास्पद वस्तू कोणी तिथे आणून ठेवली, याचा तपास सुरू आहे.

– अमोल तांबे (पोलीस उपायुक्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 2:14 am

Web Title: bomb like thing created panic dd 70
Next Stories
1 करोनाचा कहर : शाळा बंद, पण खासगी शिकवण्या, वरिष्ठ महाविद्यालये सुरू
2 करोना लसीकरणासाठी जाताना सहव्याधीग्रस्तांनी काळजी घ्यावी
3 दर बुधवारी सौंदाणे,वडनेरसह पाच आरोग्य केंद्रांवर करोना लसीकरण
Just Now!
X