19 January 2021

News Flash

खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : व्यवसाय करायचा असल्यास दर महिन्याला १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या गुंडांना विरोध केला असता चार गुंडांनी व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यास संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी काळे (३८, रा. चाडेगाव) हे जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. त्या वेळी संशयित सचिन मानकर, ज्ञानेश्वर गुळगुळे, अमोल नागरे आणि करण घुगे हे त्या ठिकाणी आले. चौघांनी काळे यांना तुला व्यवसाय करायचा आहे की नाही, असा प्रश्न विचारत जर तुला काम करायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली.  ही मागणी काळे यांनी अमान्य करताच संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच कुटुंबीयांनी धाव घेतली असता त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तुमच्याकडे पाहून घेऊ, गावात राहायचे की नाही, असा दम देत गुंड पळून गेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 2:44 am

Web Title: businessman assult for ransom in nashik zws 70
Next Stories
1 शहरातील सराफ व्यावसायिकांकडून बंद मागे
2 तीन सत्ताकेंद्रे झाल्यास राज्याचे नुकसान
3 शहरातील करोना स्थितीच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा आज दौरा
Just Now!
X