News Flash

ऑनलाइन नोंदणी न झाल्यास शस्त्र परवाना रद्द

राज्यातील शस्त्र परवानाधारकांकडील परवान्याच्या ऑनलाइन नोंदणीला शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ऑनलाइन नोंदणी न झाल्यास शस्त्र परवाना रद्द
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलिसांचा इशारा

राज्यातील शस्त्र परवानाधारकांकडील परवान्याच्या ऑनलाइन नोंदणीला शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शस्त्र परवानाधारकांच्या परवान्याची माहिती ऑनलाइन एनडीएल संगणकीय प्रणालीत समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक शस्त्र परवानाधारकांनी आपला परवाना एनडीएल प्रणालीत भरून युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक तयार झाला आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. ३१ मार्चनंतर ज्या ज्या परवानाधारकांचे शस्त्र परवाना ऑनलाइन झाले नसेल त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या अर्थात शहराचा विचार करता अधिकृत शस्त्र परवानाधारकांची संख्या १४००च्या आसपास आहे. मागील काही वर्षांत अधिकृतपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अधिकृत शस्त्र बाळगण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत विहित निकषांची पूर्तता करून परवाना दिला जातो. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५१ अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवान्यांची माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाने एनडीएल संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याअंतर्गत परवानाधारकाचा ‘युनिक आयडेंटीफिकेशन’ क्रमांक (यूआयएन) तयार होणार आहे. शस्त्र परवाने ऑनलाइन नोंदणीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शासनाने या मुदतीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली. प्रत्येक अधिकृत परवानाधारकाने आपला परवाना या प्रणालीत भरून यूआयएन तयार झाला आहे की नाही याची पोलीस आयुक्तालयातील परवाना शाखेत येऊन खात्री करण्याची आवश्यकता आहे. त्याची नोंद आपल्या परवान्यावर करून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्या शस्त्र परवानाधारकांचा यूआयएन क्रमांक तयार झाला नसेल त्यांनी समक्ष येऊन अर्जाद्वारे माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यासाठी परवानाधारकांनी आपले छायाचित्र, आधारकार्ड, पॅनकार्डची छायांकित प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडीसह आवश्यक कागदपत्रे पोलीस आयुक्तालयातील परवाना शाखेत जमा करावी. ३१ मार्च २०१८ नंतर ज्या परवानाधारकांचे शस्त्र परवाने ऑनलाइन झालेले नसतील, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे सर्व शस्त्र परवानाधारकांनी विहित मुदतीत परवाना नूतनीकरण, ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2018 1:29 am

Web Title: canceled arms licenses if not registered online says nashik police
Next Stories
1 कांदा विक्रीची रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे द्यावी
2 पारदर्शक कारभारासाठी मुंढेंची ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली
3 पावसाळ्यापूर्वी नव्या इमारतीत ‘बिटको’
Just Now!
X