News Flash

नाशिकरोडमध्ये आज ‘कॅथिड्रल’चे उद्घाटन

या  कॅथ्रिडलचे वैशिष्टय़ म्हणजे धर्मप्रांताचे मुख्यालय आणि त्याला जोडुन चर्च राहणार आहे.

कॅथिड्रल उद्घाटन सोहळा कार्डिनल ऑसवल्स ग्रेशिअस यांच्या हस्ते होत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक कॅथलिक धर्मप्रांतात मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिकरोड येथील सेंट फेलोमिना हायस्कूललगत असलेल्या संत आंद्रा चर्च  येथे कॅथिड्रल उद्घाटन सोहळा कार्डिनल ऑसवल्स ग्रेशिअस यांच्या हस्ते होत आहे. नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे बिशप लुर्डस डॅनियल यावेळी उपस्थित राहतील.

या  कॅथ्रिडलचे वैशिष्टय़ म्हणजे धर्मप्रांताचे मुख्यालय आणि त्याला जोडुन चर्च राहणार आहे. सध्या नाशिक धर्मप्रांतात लहान मोठी अशी ३५ चर्च असून एकूण ११० धर्मगुरू आहेत. ३८ धर्मगुरू शिवाय येशू संघ, डॉन बास्को कॅपुचियन, पिलार, रिडॅमटोरिस्ट, पलोटाईन, डॉमिनिकन आदी धार्मिक संस्थांचे धर्मगुरू कार्यरत आहेत. नाशिक धर्मप्रांताला कॅथ्रिडल लाभावे, यासाठी बिशप भालेराव यांनी प्रयत्न केले. मात्र काही तांत्रिक कारणाने हे काम होऊ शकले नाही. आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी बिशपपदाची धुरा स्वीकारताच या कामास गती दिली. त्यांच्या जागी आलेल्या बिशप लुर्डस डॅनियल यांनी हे काम पूर्णत्वास नेले. या सोहळ्यास ख्रिस्त बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कॅथ्रिडल समितीने केले आहे.

कॅथ्रिडलचे वैशिष्टय़

या कॅथ्रिडलमध्ये सुमारे दोन हजार भाविक एकाच वेळी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मध्ययुगीन युरोपातील गॉथिक शैलीचे स्थापत्यशास्त्र वापरत याची रचना करण्यात आली आहे. तसेच पास्टरल सेंटर-कॅटेकॅटिकल सेंटर आणि धर्मगुरू निवासस्थान या ठिकाणी आहे. तसेच वरील मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह तयार करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:10 am

Web Title: cathedral inauguration ceremony at st philomena convent high school
Next Stories
1 ‘जबाब दो’ मोर्चाद्वारे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री लक्ष्य
2 वाहनाच्या धडकेने टोल नाका कर्मचाऱ्याचा मृत्यू
3 कचरा पेटी घोटाळा
Just Now!
X