पोवाडय़ांतून राष्ट्रभक्तीचा जागर केला जाणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर शहर परिसरात वातावरण भगवेमय झाले आहे. पुलवामा हल्ल्याचे सावट जयंतीच्या तयारीवरही दिसून येत असून जयंतीनिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पोवाडय़ांनी देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवले जाईल. शिवसेनेसह अनेक मंडळांनी शिवजयंतीची मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
Rangpanchami was celebrated in Tuljabhavani temple in a devotional atmosphere
जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंगळवारी असून राजकीय पक्षांनी ती उत्साहात साजरा करण्याची तयारी केली होती. परंतु पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. सोमवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारून भ्याड हल्ल्याचा निषेध केला. राजकीय पक्ष, सामाजिक-धार्मिक संघटना, शाळा-महाविद्यालये आदींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले जात आहे. शिवजयंतीनिमित्त काही मंडळांनी वाढता दहशतवाद, शहीद जवानांना श्रद्धांजली असे देखावे सादर करण्याची तयारी केली. पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख चौक, रस्ते भगवेमय करण्याचे काम प्रगतिपथावर होते. पोवाडय़ांनी राष्ट्रभक्ती जागविण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा मित्र मंडळाने पुलवामा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर, मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्ष शिवजयंती साजरी करणार असून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. राजकीय पक्षांबरोबर इतर संघटनांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वराज्य फाऊंडेशनतर्फे गंगापूर रस्त्यावरील बापू पुलाजवळ सकाळी मानवी साखळीचे आयोजन केले आहे. शहीद जवान आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सीमेवरील सैनिकांमागे संपूर्ण देश एकसंध उभा आहे, हे या मानवी साखळीतून दाखविले जाणार आहे. या उपक्रमात दिव्य, आकार फाऊंडेशन, सुसंस्कार प्रतिष्ठान सहभागी होणार आहे.

मिरवणूक मार्गावर निर्बंध

शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाकडी बारव ते रामकुंड या मिरवणूक मार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. शिवजयंतीनिमित्त वाकडी बारव, जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके मार्ग, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकातून रामकुंड अशी मिरवणूक निघते. मिरवणुकीचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी म्हटले आहे. मिरवणूक काळात वाहनधारकांना पर्यायी मार्गाने मार्गस्थ व्हावे लागेल. या दिवशी निमाणी स्थानक आणि पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या बसगाडय़ा पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या गाडय़ा आडगाव नाका, कन्नमवार पुलावरून पुढे द्वारका चौकातून इतर ठिकाणी जातील.