21 October 2020

News Flash

सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील काळविहीर येथे १४ वर्षांच्या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. 

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काळविहीर येथे १४ वर्षांच्या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्यातील काळविहीर येथील सातवीच्या वर्गात शिकणारा सागर गोविंद सोडनर (१४) हा गुराखी म्हणून काम करतो. सकाळी तो जनावरे घेऊन जंगलात चारण्यासाठी गेला होता. त्या वेळी त्याला सापाने दंश के ला. हे सोबत असलेल्या व्यक्तीच्या लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच सागरचा मृत्यू झाला. वाळविहिर या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र असून ते नेहमीच बंद असते. त्या ठिकाणी परिचारिकाही राहत नसल्याची स्थानिकांची तक्रोर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 2:40 am

Web Title: child dies of snake bite zws 70
Next Stories
1 पोलिसांचे रंगीत तालीमसह पथसंचलन
2 जिल्ह्य़ात १९ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून दुसरा भाग पूर्ण
3 सूचना देऊनही असहकार्य
Just Now!
X