दीडशे टवाळखोर, सुसाट वाहनचालकांवर कारवाई

महाविद्यालयीन तरुणांचा वाढणारा गुन्हेगारी घटनांमधील सहभाग, त्यांच्याकडे सहज मिळवून येणारी शस्त्रे, महाविद्यालयात होणारी छेडछाड, वाहने भरधाव चालविण्याचे प्रकार.. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी महाविद्यालय परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. साध्या गणवेशात पोलीस कर्मचारी भ्रमंती करत असल्याने टवाळखोर सहजपणे हाती लागतात.

yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

वेगवेगळ्या महाविद्यालयांत झालेल्या कारवाईत १४० हून अधिक टवाळखोर, बाईकस्वार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहीम वारंवार राबविली जाणार आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या साहाय्याने विद्यार्थी सुरक्षितता तसेच प्रबोधन यादृष्टिने उपाय सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मागील आठवडय़ात आरंभ महाविद्यालयात पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईत विद्यार्थ्यांकडे धारदार शस्त्रे आढळून आली होती. दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांकडे तलवार आढळली. शस्त्रासह संबंधित विद्यार्थ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. महाविद्यालय परिसरातील भाईगिरीचे अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांमधील वाद अनेकदा हाणामारीपर्यंत जातात. महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. महाविद्यालयाशी संबंधित नसलेल्या टवाळखोरांचा परिसरात मुक्त वावर असतो. ही स्थिती लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासन आणि पोलीस विभागाने महाविद्यालय परिसरात अचानक मोहीम राबवत टवाळखोरांची धरपकड सुरू केली आहे. महाविद्यालय परिसर मोठा असल्याने गणवेशात पोलीस या परिसरात गेल्यास टवाळखोर सहजपणे अन्य मार्गाने गायब होतात. महाविद्यालयाशी संबंधित नसलेल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशात या ठिकाणी गस्त सुरू केली आहे.  परिमंडळ दोनमधील सिडको महाविद्यालय, जी. डी. सावंत महाविद्यालय, नाशिकरोडचे बिटको महाविद्यालय, गुरूगोबिंद सिंग तंत्रनिकेतसह इतर महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली गेली. बहुतांश महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षितता बोटावर मोजण्या इतक्याच सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने होत आहे. काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. ज्यांचा महाविद्यालय किंवा शिक्षणाशी कोणताही संबंध नाही, अशी टवाळखोर मंडळी पोलिसांना मोठय़ा प्रमाणात आढळली. साध्या पेहरावात विद्यार्थ्यांकडील ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. काही युवक आवारात टिंगलटवाळी करत होते तर काही महाविद्यालया समोरील चहा किंवा खाद्य पदार्थाच्या टपरीवर अश्लील शेरेबाजी, मुलींची छेडखानी करत असल्याचे दिसून आले. काही मुलींवर प्रभाव पडावा यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढवत कर्णकर्कश आवाजात कसरती करत होते. पोलिसांनी अशा सर्वावर कारवाई केली.

साध्या वेशातील पोलिसांनी महाविद्यालय प्रवेशद्वार, बाहेरील आवार, वाहनतळ यासह महाविद्यालयाच्या उपाहारगृहात विद्यार्थ्यांकडे ओळखपत्राची मागणी केली. ज्यांच्याकडे ती नव्हती, अशा विद्यार्थ्यांना प्राचार्याकडे नेण्यात आले, काहींच्या घरी संपर्क साधत पालकांसह विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. या प्रकाराबाबत पोलिसांनी प्राचार्य, प्राध्यापक, आस्थापना प्रमुखांशी चर्चा करत विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करण्याची सूचना केली.

महाविद्यालयात अचानक मोहीम

गेल्या काही दिवसांत विद्यार्थिनी, प्राचार्य आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून टवाळखोरांबाबत तक्रारी येत आहेत. या पाश्र्वभूमीवर, शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात मोहीम राबविली गेली. पुढील काळात अकस्मात ही कारवाई होईल. आतापर्यंत जवळपास १५० टवाळखोर व वाहनधारक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

-श्रीकांत धिवरे (पोलीस उपायुक्त)