07 July 2020

News Flash

‘रमी’ मध्ये हरल्यानंतर ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार

पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याच्याविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : वडिलांच्या बँक खात्यातील साडेदहा लाख रुपये ‘रमी’ मध्ये हरल्यानंतर मुलानेच सायबर पोलिसात तक्रार देत भामटय़ांनी ऑनलाइन गंडा घातल्याचा बनाव रचला. परंतु, सायबर पोलिसांच्या तपासातून मुलानेच हेराफेरी केल्याचे उघड झाले. मुलाचा हा पराक्रम सहन न झाल्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याच्याविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड येथे सकेपाल धिंगण राहतात. गावाकडील जमीन विकून नाशिकमध्ये घर घेण्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेत १८ लाख, ५९ हजार ४० रुपये ठेवले होते. त्या बँक खात्याशी सकेपाल यांचा मुलगा विकी याचा भ्रमणध्वनी क्रमांक संलग्न करण्यात आला होता. मे महिन्यापासून बँकेतून कोणताही संदेश येत नसल्याने धिंगण यांनी मे महिन्यात बँक खात्याचे लिंकनुसार खाते तपासले असता त्यातून १० लाख, ६७ हजार १३८ रुपये काढल्याचे लक्षात आसे. वडिलांना हा ऑनलाइन हेराफेरीचा प्रकार असल्याचे सांगत संशयित विकीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तपास केला असता या हेराफेरीत विकीचा सहभाग असल्याचे लक्षात आले.

संशयित विकी यास रमी खेळण्याचा नाद असून  त्याने वडिलांच्या बँक खात्यातून ऑनलाइन साडेदहा लाखांची रक्कम परस्पर काढून घेत खेळात वापरली. हा प्रकार लपविण्यासाठी वडिलांसह अन्य व्यक्तींना तो ऑनलाइन गंडा असल्याचे भासवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 12:15 am

Web Title: complaint of online fraud after losing money in rummy game zws 70
Next Stories
1 नाशिकशी नाळ तुटल्याने मनमाडकरांच्या नोकऱ्याही धोक्यात
2 ..अन्यथा मंत्री, लोकप्रतिनिधींच्या दारात कांदे ओतणार
3 आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अंतिम वर्ष परीक्षा १६ जुलैपासून?
Just Now!
X