News Flash

लष्करी अळीमुळे मका पीक संकटात

यंदा मका पिकावर मोठय़ा प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्याकडून पीक यंत्राद्वारे उद्ध्वस्त

नाशिक : यंदा मका पिकावर मोठय़ा प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. वेगवेगळ्या औषधांचीा फवारणी करूनही मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथील रमेश आहिरे यांनी आपल्या दोन एकर मक्याच्या उभ्या पिकावर यंत्र फिरवले. काही ठिकाणी जनावरे, मेंढय़ा शेतात सोडल्या जात असल्याचे चित्र आहे.

सटाणा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली असून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने पुढे जनावरांच्या चाऱ्याचे काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करतात पण त्याचाही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आधी मका पिकावर कोणताच रोग पडत नव्हता. जनावरांच्या चाऱ्यासाठी पोषक असे मका पीक आहे. चाऱ्यासह उत्पादनासाठी दुहेरी फायदा आहे. दुभत्या जनावरांच्या संगोपनासाठी मक्याचे पीक घेतले जाते. कमी खर्चात हमखास येणाऱ्या मक्याला सध्या अमेरिकन अळीचे ग्रहण लागल्याने यंदा मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

मका हे कमी खर्चातील पीक असल्याने कसमादे परिसरातील शेतकरी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात त्याची पेरणी करतो. त्यामुळे चाऱ्याचा प्रमुख प्रश्न मार्गी लागतो. यंदा मात्र मोठय़ा प्रमाणत अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी आर्थिक झळ बसत आहे. एका महिन्यात चार चार वेळा फवारणी करूनदेखील अळीवर नियंत्रण मिळत नसून खर्चात मोठी वाढ होत आहे.  अळीच्या नियंत्रणासाठी महागडी औषधे फवारणी करावी लागली. तरीदेखील अळीचे प्रमाण वाढत गेले. दोन एकरांत ३५ ते ४० हजार रुपये खर्च करूनही अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकात रोटर फिरवल्याचे रमेश अहिरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:21 am

Web Title: corn crop in crisis due to armyworm zws 70
Next Stories
1 ढोल-ताशांचा नवा ताल, नवा सूर!
2 आरोग्य, पाणीप्रश्नाविषयी जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी जागरूक
3 कामगारांची संख्या आणि कामाचे तासही आटले..
Just Now!
X