09 July 2020

News Flash

Coronavirus : नाशिक पूर्व, पंचवटी विभागात करोनाचा अधिक प्रादुर्भाव

शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११ दिवसांवर

प्रतिकात्मक छायाचित्र

शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११ दिवसांवर

नाशिक : शहरात नाशिक पूर्व विभागात करोनाचे सर्वाधिक ६७८, तर त्या खालोखाल पंचवटीत ५७१ रुग्ण असून उर्वरित चार विभागात रुग्णसंख्या २०० च्या आतमध्ये आहे. दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा वेगाने फैलाव होत असून सोमवारी शहराच्या रुग्णसंख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११ दिवसांवर आला आहे. सोमवारी १०८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. तर १०० संशयित रुग्ण दाखल झाले.

पावसाळ्याच्या हंगामात शहरात करोनाचा कहर सुरू असून रुग्ण संख्या झपाटय़ाने विस्तारत आहे. दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचे अधिक रुग्ण आढळत आहे. या क्षेत्रात समूह संसर्गाला सुरूवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. ही स्थिती प्रादुर्भाव वाढविण्यास कारक ठरणार असल्याची धास्ती आहे.

शहरातील सहापैकी नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात करोनाबाधितांच्या आकडेवारीने ५०० चा टप्पा ओलांडला आहे. या भागातील दाट लोकवस्ती आणि फुलेनगरमधील भाग करोनाचे केंद्रबिंदू ठरले. सातपूर विभागात १३८, नाशिकरोडमध्ये १५५, सिडको विभागात १७७ तर नाशिक पश्चिम विभागात १८७ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांपैकी ८२३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत ११०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनामुळे ९९ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या पूर्व विभागात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवसाचा आहे. तर पंचवटीत तो ११ दिवस आहे. नाशिकरोडमध्ये १० दिवसात, सातपूरमध्ये ११, नाशिक पश्चिममध्ये १४, सिडको १३ आणि सातपूरमध्ये ११ दिवसात रुग्ण संख्या दुप्पट होत आहे.

सोमवारी रुग्णसंख्येत नव्याने १०८ ची भर पडली. यामुळे सायंकाळपर्यंत रुग्णांची एकूण आकडेवारी २०२५ वर गेली आहे.

युवकांसह मध्यम गटात अधिक प्रादुर्भाव

शहरातील करोनाबाधितांमध्ये ५७ टक्के पुरूष, तर ४३ टक्के महिलांचा समावेश आहे. यात वय वर्ष २१ ते ४० वयोगटातील ७६१, ४१ ते ६० वयोगटातील ५७०, ६१ वर्षांहून पुढील २४२, ११ ते २० वयोगटातील २११ आणि शून्य ते १० वयोगटातील १३२ रुग्णांचा समावेश आहे. तरुणांबरोबर ४१ ते ६० वयोगटातील व्यक्तींना करोनाचा अधिक्याने प्रादुर्भाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कुटुंबातील महिलांना पुरूषांमुळे अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त बाहेर फिरतांना पुरेशी काळजी न घेतल्याने पुरूष बाधित झाले. कुटुंबातील महिला आणि अन्य सदस्य त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 3:09 am

Web Title: corona effect more in nashik east and panchavati area zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘१०८ रुग्णवाहिका’ रुग्णांसाठी आधार
2 सेना-भाजप नगरसेवकांकडून पोलिसाला मारहाण
3 करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती आता एका अ‍ॅपवर
Just Now!
X