नाशिक : जिल्ह्य़ात करोनाग्रस्तांची संख्या ८६,००४ इतकी झाली असून यापैकी ७६ हजार ९८५ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सात हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सक्रि य रुग्णांमध्ये २५४ ने घट झाली आहे. आतापर्यंत एक हजार ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ५२५, चांदवड  ९५ , सिन्नर ८६५, दिंडोरी २४३, निफाड ७७८, देवळा ६८, नांदगांव १८४, येवला ८६, त्र्यंबकेश्वर  ७५, सुरगाणा आठ, पेठ ३०, कळवण ७०, बागलाण १८५, इगतपुरी ११३, मालेगाव ग्रामीण २०३  याप्रमाणे एकूण तीन हजार ५२८ करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ५३९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २९५, तर जिल्ह्य़ाबाहेरील १२० याप्रमाणे एकूण सात हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८३.०९, टक्के, नाशिक शहरात ९२.४२ टक्के, मालेगावमध्ये ८८.५४ टक्के, तर जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.२४ टक्के आहे. तसेच जिल्ह्य़ात बरे होण्याचे प्रमाण ८९.५१ इतके आहे. तसेच, नाशिक ग्रामीण ५२२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८१४, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १६१ व जिल्हाबाहेरील ३६ अशा एकूण १ हजार ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५१ टक्के आहे.